Cabinet Meeting : राज्यातील ४५ रोप-वेच्या कामाला मान्यता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

105
Cabinet Meeting : राज्यातील ४५ रोप-वेच्या कामाला मान्यता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Cabinet Meeting : राज्यातील ४५ रोप-वेच्या कामाला मान्यता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास मंगळवारी १८ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) मान्यता देण्यात आली. आजच्या बैठकीत राज्य सरकारमार्फत १६ आणि राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. एनएचएलएमएल मार्फत २९ अशी एकूण ४५ रोपवे (Ropeway) ची कामे हाती घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. ही रोपवे (Ropeway) ची कामे करण्यासाठी एनएचएलएमएल (NHLML) या यंत्रणेला आवश्यक जागा ३० वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Decision: राज्यात सहावा वित्त आयोग स्थापन ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय)

या योजनेच्या अंतर्गत काही प्रकल्पास राज्य सरकारने एनएचएलएमएलला (NHLML) समभाग हिस्सा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नात राज्य सरकारचा हिस्सा राहील, अशा या महसूली प्रारूपासही मान्यता देण्यात आली. यातील प्रकल्पनिहाय स्वतंत्र करार केला जाणार आहे. त्यापूर्वी या प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीपुढे सादर करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.