2022-23 हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमतीला मंजूरी!

110

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार संबंधित मंत्रिमंडळ समितीने 2022-23 च्या हंगामाच्या कच्च्या तागासाठी (ज्यूट) किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) मंजूरी दिली. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारशींवर ही आधारित मंजूरी देण्यात आली आहे.

इतका परतावा मिळणार

कच्च्या तागाचा एमएसपी (टीडीएन3 समतुल्य टिडी 5 श्रेणी) 2022-23 हंगामासाठी 4 हजार 750 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल 250 रुपये इतकी आहे. यामुळे संपूर्ण भारतातील सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 60.53 टक्के परतावा मिळेल.

( हेही वाचा काय सांगताय… आता बारावीत चांगले मार्क्स नसले तरीही प्रवेश मिळवणार! )

तर केंद्र सरकार भरपाई देईल

2022-23 हंगामासाठी कच्च्या तागाचा घोषित एमएसपी हा सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी निश्चित करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे. हे नफ्याच्या प्रमाणात किमान 50 टक्के हमी देते. ताग उत्पादकांना चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी आणि दर्जेदार तागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल आहे. भारतीय ताग महासंघ (ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही केंद्र सरकारची मूल्य आधारभूत केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून कार्य सुरू ठेवेल आणि यात जर काही नुकसान झाले, तर केंद्र सरकारकडून त्याची पूर्ण भरपाई केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.