कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता; DCM Eknath Shinde यांची घोषणा

61
कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता; DCM Eknath Shinde यांची घोषणा
  • प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी गुरूवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली. या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदतच होणार असून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले.

(हेही वाचा – Transfer : १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर बदली यांची वन विभागात बदली)

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपण मुख्यमंत्री य नात्याने कल्याण-डोंबिवलीकरांना वाढीव पाणीपुरवठा महायुतीचे सरकार आल्यास पूर्ण करू असा शब्द दिला होता. तो आज पूर्णत्वास गेल्याचे समाधान असल्याची भावनाही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाच्या विकासाचे PM Narendra Modi यांच्याकडून कौतुक)

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इ. पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली होती. त्यास अनुसरूनच प्रत्यक्षात या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. या योजनेचा लाभ कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार असून त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होण्याबरोबरच १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.