Sambhal मध्ये पुन्हा उत्खननावेळी सापडली ‘पायरी विहीर’

54
Sambhal मध्ये पुन्हा उत्खननावेळी सापडली 'पायरी विहीर'
Sambhal मध्ये पुन्हा उत्खननावेळी सापडली 'पायरी विहीर'

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभलमधील (Sambhal) चंदौसी येथे प्रशासनाकडून जमिनीच्या उत्खननावेळी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. येथील शिव-हनुमान मंदिर (Shiva-Hanuman Temple) ४६ वर्षांनंतर पुन्हा उघडल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दि. २१ उत्खननादरम्यान एक पायरी विहीर सापडली. ती सुमारे १५० वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही विहीर अतिक्रमणामुक्त करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Sambhal)

( हेही वाचा : Mumbai Airport वरून नोव्हेंबर महिन्यात किती विमान उड्डाणे झाली? आकडा ऐकून अवाक व्हाल…)

महसूल विभागाने चांदौसी (Chandausi) येथील जमिनीचे उत्खनन केले असता, त्याखाली एक विहीर आढळून आली. चंदौसीचा लक्ष्मणगंज परिसर १८५७ पूर्वी हिंदूबहुल (Hindu) होता. येथे सैनी समाजाचे लोक राहत होते. संभलमध्ये ४६ वर्ष जुने मंदिर सापडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार पत्र देण्यात आले होते. यामध्ये लक्ष्मण गंज परिसरात बिलारीच्या राणीची पायरी विहीर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान दि. २१ डिसेंबर रोजी महसूल विभागातील नायब तहसीलदार धीरेंद्र सिंह परिसराचा नकाशा घेऊन तेथे पोहोचले होते. जमीन उत्खनावेळी मध्यभागी खोदकाम केल्यावर प्राचीन विहीर असल्याचे निदर्शनास आले. (Sambhal)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.