संभाजीनगर (Sambhajinagar) येथील देवगिरीचा भूईकोट गड जगात प्रसिद्ध आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दनस्वामी यांचे या गडावर वास्तव्य होते, तसेच त्यांची समाधीही याच गडावर आहे. या गडावरील भारतमातेच्या मूर्तीची नियमित पूजा करण्यात येते. ही पूजा करण्यास बंदी घालण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व विभागाने दिला आहे. याविषयी विभागाने एक पत्रक काढले आहे. याविषयी स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘येथे नियमित पूजा करणारे पुजारी श्री. राजू काशीनाथ राव कांजूणे यांना पूजा करण्यापासून रोखण्यात यावे आणि भविष्यात त्यांना पूजा करण्याची अनुमती दिली जाऊ नये’, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Maharashtra Budget Session : महसुली तूट २० हजार कोटींपेक्षा अधिक; सरकारच्या जमा खर्चाचा मेळ बसेना!)
या गडावर नानासाहेब पेशवे यांनी संकट विनायकाचे मंदिर बांधले. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिरात आणि जनार्दनस्वामी यांच्या समाधीच्या ठिकाणी पूजा-अर्चा चालू केली. वर्ष १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेण्यात आले, त्या वेळी सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून देवगिरीच्या गडावर भारतमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. येथील मूर्तींची पूजा करण्याचे दायित्व पोखारे गुरूजी यांच्या असून कांजुणे कुटुंबीय मंदिराचा सांभाळ करते.
अस्वच्छतेच्या तक्रारीमुळे पूजेवर बंदी ! – डॉ. शिवकुमार भगत, अधीक्षक, भारतीय पुरातत्व विभाग
भारतमाता मंदिर परिसरात अस्वच्छता असल्याची तक्रार काही पर्यटकांनी केली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. देवगिरी गड हा ‘नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट’ (निर्मनुष्य स्मारक) प्रकारात मोडतो. त्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारची पूजा-अर्चा करण्यावर बंदी आहे. मंदिराच्या स्वच्छतेचे दायित्व आमचे असून त्यासाठी आमचे कर्मचारी आहेत.
हाच निकष औरंगजेबाच्या कबरीलाही लावणार का ? – अंबादास दानवे, विधान परिषद, विरोधी पक्षनेते
गडावरील मंदिरांमध्ये स्वातंत्र्यपूर्व नव्हे, तर अनेक शतकांपासून पूजा-अर्चा होत असतांना हा गड ‘नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट’ कसा असू शकतो ? पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक मंत्रालय दिंडी अन् गणेश पूजेवरही निर्बंध लादणार आहे का ? हिंदूंच्या मंदिरात पूजेला बंदी घालण्यात येत असेल, तर हाच निकष औरंगजेबाच्या कबरीलाही लावणार का ? (Sambhajinagar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community