-
ऋजुता लुकतुके
यावेळी ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नेमका ईद – उल – फित्र या सणाच्याच दिवशी येत आहे. ईदची राष्ट्रीय सुट्टी आधीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जण संभ्रमावस्थेत आहेत की, बँका किंवा वित्तीय संस्थांनाही या दिवशी सुट्टी असेल का? मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेनं त्यासाठी १७ मार्चला एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२५ हा दिवस बँकांसाठी कामकाजाचा दिवस असणार आहे. (Are Banks Working on 31st March ?)
(हेही वाचा – Nashik News : हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला ; सहा जण जखमी)
‘करदात्यांच्या सोयीसाठी सरकारी यंत्रणेशी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांचे व्यवहार सोमवारी ३१ मार्चला सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेचे सर्व व्यवहार नियमितपणे सुरू राहतील,’ असं रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटलं आहे. सरकारी पेमेंट्स आणि रिसिट्सचे व्यवहारही त्याच आर्थिक वर्षांत पूर्ण व्हावेत आणि ते नवीन आर्थिक वर्षापर्यंत ढकलले जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे. विविध धनादेशांचं क्लिअरिंगही त्याच दिवशी पार पडेल. (Are Banks Working on 31st March ?)
(हेही वाचा – Operation Brahma : भारताने 55 टन जीवनावश्यक साहित्य पाठवले म्यानमारला)
आयकर विभागाचं कार्यालयही २८ ते ३१ मार्च या कालावधीत अव्याहत सुरू राहणार आहे. कामकाजाच्या नियमित वेळा त्यासाठी पाळण्यात येतील. पण, शनिवार, रविवार या सुट्ट्या पाळल्या जाणार नाहीत. आर्थिक वर्षाचा अपडेटेड रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ ही आहे. शिवाय २०२५ आर्थिक वर्षातील सर्व व्यवहार त्याच वर्षी पूर्ण व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २८, २९, ३० आणि ३१ मार्च २०२५ ला आयकर विभागाची कार्यालयं सुरू राहतील. तसंच आर्थिक वर्षातील विविध विमा योजनांची कामंही आर्थिक वर्षाच्या शेवटी खोळंबलेली असतात. त्यामुळे देशातली विमा नियमाक प्राधिकरणाने २८ ते ३१ मार्च रोजी विमा कार्यालयंही सुरू ठेवण्यात येणार आहेत. विमाधारकांची सोय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Are Banks Working on 31st March ?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community