भारताच्या शेजारी देशांमध्ये सध्या अशांतता आणि अंतर्गत संघर्ष सुरू आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानसोबत ईशान्येकडील म्यानमारमध्येही (Myanmar) सेनादलांमध्ये अशांतता आहे. म्यानमारमधील युनायटेड लीग ऑफ अराकान (United League of Arakan) आणि त्यांची लष्करी संघटना असलेली अराकान आर्मी स्वातंत्र्य मिळवण्याच्या तयारीत आहे.
(हेही वाचा – Mahakumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस धावणार; असे असेल बसेसचे नियोजन)
मिलिट्री क्षेत्रीय कमांडचे मुख्यालय असलेल्या शहरावर कब्जा
२०२४ च्या अखेरच्या दिवशी अराकान आर्मीने ग्वा शहर आपल्या ताब्यात घेतले होते. मागच्या आठवड्यात बंडखोर अराकान आर्मीने अन शहरावर कब्जा केला होता. हे शहर पश्चिम मिलिट्री क्षेत्रीय कमांडचं (Western Military Regional Command) मुख्यालय आहे. त्यावरून या शहरांचे महत्त्व दिसून येते. काही दिवसांपूर्वीच अराकान आर्मीने माऊंगडॉ नगर लष्कराच्या ताब्यातून हिसकावून घेतले होते. त्याबरोबरच अराकान आर्मीचा बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर पूर्णपणे कब्जा झाला होता.
१८ पैकी १५ शहरांवर नियंत्रण
एकूणच अराकान आर्मीने म्यानमार युनियनमधील रखाइन (Rakhine) प्रांतामधील १८ पैकी १५ शहरांवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र तीन प्रमुख ठिकाणे ही अद्याप तरी म्यानमारच्या लष्करी सत्तेच्या ताब्यात आहेत. त्यामध्ये बंगालच्या उपसागरामधील सित्तोय बंदराचा समावेश आहे. या बंदराच्या बांधणीसाठी कालाधान मल्टीमॉडेल प्रकल्पांतर्गत भारताने अर्थसाहाय्य केले होते. दुसरे ठिकाण आहे चीनच्या मदतीने बांधण्यात आलेले क्याउकफ्यू बंदर आणि मुआनांग शहर म्यानमारच्या लष्कराच्या ताब्यात आहेत.
रखाइन प्रांतावर कब्जा करून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात यशस्वी झाले, तर १९७१ मध्ये झालेल्या बंगालादेशच्या निर्मितीनंतर आशियामध्ये पुन्हा एका देशाची लष्करी अभियानाने फाळणी होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community