पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लष्कराच्या जवानाची गोळ्या झाडून हत्या

101

सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी आलेल्या लष्कराच्या जवानाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना बिहारमधील पाटणा येथे घडली आहे. बबलू कुमार असे या जवानाचे नाव आहे. शुक्रवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली आहे. पटणा येथील कंकरबाग पोलिस ठाण्याच्या चिडियांतर पुलाजवळ जवानाच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

पत्ता विचारण्याचा बहाणा

बबलू हे गुवाहाटी येथे लष्करी सेवेत होते आणि आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ते पटणा येथे आले होते. राजधानी एक्स्प्रेस पकडण्यासाठी बबलू हे पाटलीपुत्र येथून दुचाकीने चालले होते. ते आपल्या मित्राच्या मागे दुचाकीवर बसलेले असताना मागून अजून एक दुचाकी त्यांच्या जवळ आली आणि त्यांनी पटणा स्टेशनचा पत्ता विचारण्यासाठी दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने बबलू यांच्या डोक्यात गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

बबलू यांना श्रद्धांजली

दरम्यान, कंकरबाग पोलिसांकडून संबंधित गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून हा तपास होणार आहे. बबलू यांचे पार्थिव दानापूर येथील लष्करी कार्यालयात आणण्यात आले त्यानंतर अधिकारी आणि जवानांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.