BMC : मुंबईत सुमारे ६ हजार बांधकामे सुरू, आयुक्तांनी दिला कठोर कारवाईचा इशारा

मुंबईत सुमारे ६ हजार बांधकामे स्थळं आहेत, ही बाब लक्षात घेता धूळ तसेच प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वं सोमवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रसारित केली जातील.

154
BMC : मुंबईत सुमारे ६ हजार बांधकामे सुरू, आयुक्तांनी दिला कठोर कारवाईचा इशारा
BMC : मुंबईत सुमारे ६ हजार बांधकामे सुरू, आयुक्तांनी दिला कठोर कारवाईचा इशारा

मुंबईत सुमारे ६ हजार बांधकामे स्थळं आहेत, ही बाब लक्षात घेता धूळ तसेच प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वं सोमवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रसारित केली जातील. त्यासह अस्तित्वातील सर्व नियम आणि परिपत्रकांप्रमाणे यंत्रणा व उपाययोजना प्रत्यक्ष कार्यान्वित झालेली आढळली पाहिजे, अन्यथा त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले. (BMC)

वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त चहल हे बोलत होते. या बैठकीत आयुक्त चहल यांनी धूळ व प्रदूषण नियंत्रासाठीचे विविध निर्देश देतानाच सक्त सूचनाही केल्या. (BMC)

या बैठकीला प्रधान सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, बांधकामे व विकास क्षेत्रातील क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या संघटनांच्या प्रतिनिधींची हजेरी होती. (BMC)

(हेही वाचा – Gujarat ATS : गुजरात ATSचा पाकिस्तानला धक्का; केली मोठी कारवाई)

या बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल म्हणाले की, पावसाळा संपून जेमतेम दहा पंधरा दिवस उलटत नाही तोच मुंबई प्रदेशात व मुंबई महानगरात देखील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याची दखल केंद्र व राज्य शासनानेही घेतली असून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवेतील प्रदूषण वाढण्यामागे धूळ हा एक मोठा घटक ठरतो आहे. बांधकाम व्यवसाय अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असला तरी त्यामध्ये धूळ प्रतिबंधक उपाययोजना करणे, प्रदूषणास कारणीभूत इतरही घटकांना नियमांनुसार कार्यवाही करायला लावणे, यासाठी मुंबईतील सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय राखून तातडीने व सक्तीच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई प्रदेशातील इतरही महानगरपालिका व संबंधित संस्थांची तातडीने बैठक घेवून उपाययोजनांना गती द्यावी, असे आवाहनही चहल यांनी केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.