Terrorist Attack :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी हुतात्मा झाले

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जम्मू – काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली.

178
Terrorist Attack :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी हुतात्मा झाले
Terrorist Attack :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी हुतात्मा झाले

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी (१३ सप्टेंबर) सकाळी झालेल्या दहशतवादी (Terrorist Attack) चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपअधिक्षक शहीद झाले आहेत. १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष डोनचक आणि पोलीस उपअधीक्षक हिमायून मुझमिल भट अशी हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जम्मू – काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली. बुधवारी सकाळी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील सर्च ऑपरेशनदरम्यान जोरदार गोळीबार झाला, त्यात तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. त्यांना विमानाने श्रीनगरला नेण्यात आले. परंतु, तिथे त्यांचा मृत्यू झाला. यात कोणत्याही अतिरेक्याच्या मृत्यूची बातमी नाही. या चकमकीप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त पथक घनदाट जंगलातून जात असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरुवातीला जे स्फोट आणि गोळीबार झाले त्यातच तिघांचा मृत्यू झाला. गोळीबार इतका तीव्र होता की संयुक्त पथकाला प्रतिक्रिया देण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. दहशतवाद्यांनी सतत गोळीबार केला, ज्यामुळे जखमी अधिकाऱ्यांना लवकर बाहेर काढण्यात अडथळा निर्माण झाला.

(हेही वाचा : Twakando : आशियाई स्पर्धेतील पदक सुरुवात, ऑलिम्पिक ध्येय ठेवा; सावरकर तायक्वोंदो अकॅडमीच्या स्पर्धकांचे रणजित सावरकरांनी केले कौतुक)

सिख लाइट इन्फंट्रीचे अधिकारी मनप्रीत सिंग हे कोकरनाग येथील १९ राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व करत होते. २०२१ मध्ये त्यांना सेना पदक मिळाले होते. तर, हिमायून मुझमिल भट हे २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांत दाखल झाले होते. जम्मू काश्मीरचे निवृत्त महानिरिक्षक गुलाम हसन भट यांचे ते सुपूत्र होते.

दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या महिनाभरातील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. ४ ऑगस्ट रोजी कुलगामच्या जंगलात अतिरेक्यांनी तात्पुरत्या लष्कराच्या चौकीला लक्ष्य केल्याने तीन जवान शहीद झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.