Manoj Jarange यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?

97
Manoj Jarange यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?
Manoj Jarange यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?

नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपाच्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे.

(हेही वाचा – ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी Anil Deshmukh यांच्यावर फडणवीसांचा दबाव; Shyam Manav यांचे गंभीर आरोप)

काय आहे प्रकरण ?

जालना (Jalna) येथे ‘शंभूराजे’ (Shambhu Raje) या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये नाट्यनिर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. परंतु या प्रयोगांचे पूर्ण पैसे निर्मात्याला देण्यात आले नाहीत. नाटकांचे प्रयोग आयोजित करून नाट्यनिर्मात्याचे पैसे बुडविल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धनंजय घोरपडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जरांगे (Manoj Jarange) यांना दोनदा समन्स बजावले होते. तरीही ते उपस्थित न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.