Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धीमत्तेला भारतात अच्छे दिन – डॉ. भूषण केळकर

तंत्रज्ञानाचा वेग बायोलॉजिकल स्पीडपेक्षा वाढत आहे. तेव्हा सर्वांना वेग वाढवावा लागेल. केवळ कोर्सेस आणि करिक्युलमवर विसंबुन राहण्याचे दिवस संपले असून तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनलो नाही तर एआयच्या जगात आपला टिकाव लागणार नाही - डॉ. भूषण केळकर

194
Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धीमत्तेला भारतात अच्छे दिन - डॉ. भूषण केळकर

आर्टीफिशियल इंटीलिजन्स (ए.आय.) (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेत २०१८ मध्ये भारत जगात १८ व्या स्थानी होता तर, २०२३ मध्ये १४ व्या स्थानी पोहोचला आहे. एआयच्या टॅलेंट पुलमध्ये पहिल्या स्थानावर सॅन फ्रान्सिस्को तर दुसऱ्या स्थानी बंगळुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला भारतात अच्छे दिन आले आहेत. असे प्रतिपादन आर्टीफिशियल इंटीलिजन्स तज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी केले.

(हेही वाचा – Congress Party: कॉंग्रेसला एका दिवसात दोन धक्के, मिलिंद देवरांनंतर ‘या’नेत्यानेही दिला राजीनामा)

ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन –

ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर आधारलेल्या कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत “कृत्रिम बुद्धीमत्ता – भविष्य व्यापणारे तंत्रज्ञान” या विषयावरील चौथे पुष्प डॉ. केळकर यांनी गुंफले. (Artificial Intelligence)

(हेही वाचा – Mumbai Police: रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांचे ‘हे’ नवे ट्विट सोशल मिडियावर ट्रेंड)

योग्य प्रश्न विचारण्याची बुद्धीमत्ता हवी –

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (Artificial Intelligence) आपण आपली प्रायव्हसी घालवुन बसलो आहोत.तेव्हा, एआय वर मात करण्यासाठी मानवी बुद्धीमत्ताच लागेल. त्यासाठी विश्लेषणाकडुन संश्लेषणाकडे जायला हवे, भावनांक चांगला हवा, योग्य प्रश्न विचारण्याची बुद्धीमत्ता हवी, कुतुहल हवे तरच तंत्रज्ञान उत्तर देईल.

तरच शिक्षण क्षेत्रात प्रगती …

शिक्षण क्षेत्रात नुसते तंत्रज्ञान येऊन काय उपयोग ? शिक्षकांनी गुगल प्लस प्लस व्हायला हवे, तर विद्यार्थ्यानी चॅट जीपीटी मायनस मायनस व्हायला हवे. तरच शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. असे स्पष्ट करून डॉ. केळकर यांनी, तंत्रज्ञानाचा वेग बायोलॉजिकल स्पीडपेक्षा वाढत आहे. तेव्हा सर्वांना वेग वाढवावा लागेल. कोर्सेस आणि करिक्युलमवर विसंबुन राहण्याचे दिवस संपले असून तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनलो नाही तर एआयच्या जगात आपला टिकाव लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. (Artificial Intelligence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.