विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सुरक्षा तपासणीसाठी तासन् तास मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच ताटकळत राहावे लागते. मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही रोज ओळखपत्र दाखवूनच प्रवेश मिळवावा लागतो. मंत्रालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ बसवण्याचे काम हाती घेतले असून नव्या वर्षात त्याआधारे प्रवेश दिले जातील. (Artificial Intelligence)
(हेही वाचा- Kurla Bus Accident : बेस्ट बस बंदचा चौथा दिवस; पोलीस आणि बेस्ट प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचा फटका प्रवाशांना)
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवेशासाठी ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ कार्यान्वित
‘फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी’ ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकारातील तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणकावर एखाद्या व्यक्तीचा केवळ चेहरा पाहून त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळू शकते. या तंत्रज्ञानात उच्च क्षमतेचा कॅमेरा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या प्रतिमा संग्रहित करतो आणि चेहऱ्यावरील विशिष्ट खुणा तपासतो. या डेटाबेसमध्ये जितक्या अधिक प्रतिमा असतील, तितकी ही प्रणाली चेहरे ओळखण्याचे काम सक्षमपणे करते. या प्रणालीतील संकलित डेटाबेस आधारे चेहऱ्यावरून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित केली जाते. सध्या मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश देताना याच तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्या मंत्रालयातील दहा ठिकाणी ही व्यवस्था बसवण्यात आली आहे. (Artificial Intelligence)
मंत्रालयाच्या इमारतीच्या विविध ४० ठिकाणी ती बसवली जाणार आहे. मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरून डेटाबेस संकलित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हा डेटाबेस तयार झाल्यानंतर नव्या वर्षात या माध्यमातूनच अधिकारी- कर्मचाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार असून मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांसाठीही येत्या काळात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे समजते. (Artificial Intelligence)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community