आरोग्य साक्षरता हा निरंतर चालणारा विषय असून ‘आयुर्वेद’ हे शाश्वत आहे. ‘माझी आयुर्वेद चिकित्सा’ या विषयात बदल करत ‘मी अनुभवलेली आयुर्वेद चिकित्सा’ या विषयावर अधिक स्पष्टपणे मी बोलू शकेल. मानवी आयुष्यात पंचक्रमा आहेच. मात्र आज आयुर्वेदाचा अपचार केला जात आहे. अनुभवाशिवाय किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे आयुर्वेदाच्या विरोधात अपप्रचार कोणीही करू नका, असे आवाहन करत बी.ए.एम अॅण्ड एस. आयुर्वेदाचार्य वैद्य अरुण पाटील यांनी काही प्रत्याक्षिकांसह उपस्थितांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी स्मारकांच्या उपक्रमाची माहिती उपस्थितांना करून दिली. (Ayurveda)
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई आणि वैद्यराज व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील मादाम कामा सभागृहात राष्ट्रीय आयुर्वेद दिनाप्रित्यर्थ ‘धन्वंतरी पूजन आणि व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘सी.सी.आर.ए.एस’चे सह संचालक वैद्य गोविंद रेड्डी उपस्थित होते. तसेच ‘माझी आयुर्वेद चिकित्सा’ या विषयावर बी.ए.एम अॅण्ड एस. आयुर्वेदाचार्य वैद्य अरुण पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वप्नील सावरकर यांनी वैद्य अरुण पाटील यांचे ‘हिंदूस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील पुस्तक भेट दिले. मुळात आयुर्वेदाचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजात धनत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून साजरी केली जाते. (Ayurveda)
या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, स्मारकाचे सहकार्यवाह आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर, आयुर्वेद विज्ञान मंडळांचे अध्यक्ष वैद्य सुभाष जोशी, आयुर्वेद विज्ञान मंडळांचे कार्यवाह वैद्य नंदकुमार मुळ्ये, आयुर्वेद विज्ञान मंडळांचे कोषाध्यक्ष वैद्य राजीव कानिटकर उपस्थित होते. (Ayurveda)
१५ वर्षांनंतर आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला
दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्य गोविंद रेड्डी म्हणाले की, राष्ट्रीय आयुर्वेद दिन दरवर्षी आयुष मंत्रालय आणि भारतीय चिकित्सा मंत्रालयाकडून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणारा हा कार्यक्रम स्तुत्य असाच आहे. १५ वर्षांपूर्वी आयुर्वेदाकडे पाहण्याचा डॉक्टरांचा तसेच सर्वसामान्यांचा दृष्टीकोन वेगळा होता. आता मात्र ही परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे आयुर्वेदावर आधारित संशोधन केंद्र भांडुप आणि खोपोलीत सुरु होत आहे.(Ayurveda)
Join Our WhatsApp Community