Arvind Kejriwal यांच्या अडचणीत वाढ; कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

43
Arvind Kejriwal यांच्या अडचणीत वाढ; कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश
Arvind Kejriwal यांच्या अडचणीत वाढ; कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

दिल्ली विधानसभेची (Delhi Legislative Assembly) सत्ता गमावल्यानंतर आता केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. सार्वजनिक निधीच्या गैरवापरप्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर (Arvind Kejriwal) गुन्‍हा दाखल करण्‍याचे आदेश दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. सार्वजनिक निधीच्या गैरवापरप्रकरणी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश राऊस अव्हेन्यू न्यायालयाने (Rouse Avenue Court) दिल्ली पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी शिवकुमार सक्सेना (Shivkumar Saxena) यांची याचिका दाखल केली होती. न्‍यायालयोन ती स्वीकारली. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आगामी 18 मार्च रोजी या प्रकरणी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

( हेही वाचा : Maharashtra Legislature परिसरात नवीन नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा)

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने लवकरच केजरीवाल यांनी तुरुंगवारी करावी लागेल, अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीवर चांगलीच पकड निर्माण केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.