Mumbai Building Debris : ठिकठिकाणी टाकल्या जाणाऱ्या इमारतीच्या राडारोड्यामुळे मुंबई होते विद्रुप

आयुक्तांनी दिले सर्व प्राधिकरणाला निर्देश!

140
Debris : मुंबईतील दगड विटांच्या राडारोड्याची विल्हेवाट; आता नेमला सल्लागार

मुंबई महानगरातील विविध शासकीय यंत्रणांच्‍या भूखंडांवर राडारोडा (डेब्रीज) टाकला जात असल्याने विद्रूपीकरण होत आहे, त्यास आळा घालावा. महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणेने विविध ठिकाणी सीसीटीव्‍ही बसवावेत, स्‍थानिक पोलिस प्रमुख आणि महानगरपालिकेचे सहायक आयुक्त यांनी प्राधान्‍याने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी संबधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार राज्य सरकारने गठीत केलेल्‍या अतिक्रमण निर्मूलन (स्थायी) समितीची बैठक मंगळवारी १२ सप्‍टेंबर २०२३ रोजी महानगरपालिका मुख्‍यालयात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (अतिक्रमण निर्मूलन) तेजसिंग पवार, म्‍हाडाचे उप आयुक्‍त (अतिक्रमण निर्मूलन) एस. एम. कळंबे, विमानतळ प्राधिकरणाचे सहायक व्‍यवस्‍थापक (जमीन व्‍यवस्‍थापन) संजय पाटोळे, सहायक पोलिस आयुक्‍त (पोलिस आयुक्‍त कार्यालय) दौलत साहे, मिठागारे अधीक्षक ए. पी. मोहंती, महानगरपालिकेचे सहआयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, सहायक आयुक्‍त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे आदी अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल म्‍हणाले की, मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्‍हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), म्‍हाडा, रेल्‍वे, पोर्ट ट्रस्‍ट, विमान प्राधिकरण, मिठागारे यांच्‍यासह विविध शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. शासकीय संस्‍थांच्‍या भूखंडांवरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच, येणाऱ्या सणासुदीच्या कार्यकाळात पोलिस प्रशासनाशी योग्यरित्या समन्वय साधून निष्कासनाची कारवाई हाती घ्यावी, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सर्व संबंधितांना दिले.

(हेही वाचा – Haryana Legislative Assembly : काँग्रेसचे पानीपत करण्यासाठी आप हरियाणाच्या मैदानात)

मुंबई महानगरातील विविध शासकीय यंत्रणांनी अतिक्रमण निर्मूलनकामी समन्‍वयाने कार्यवाही करावी. पोलिस यंत्रणेने देखील अतिक्रमण निर्मूलन समयी प्राधान्याने बंदोबस्‍त पुरवावा, असे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले. सर्व यंत्रणांनी अतिक्रमण निर्मूलन कारवाईची माहिती सुव्यवस्थितपणे तयार करुन जतन करावी, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्‍तांनी यावेळी संबंधितांना दिले.

विविध प्राधिकरणांच्‍या पातळीवर होणारी अतिक्रमण निर्मूलन कारवाई आदींची माहिती व सविस्‍तर तपशील योग्यरित्या जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तपास व न्यायालयीन कामकाजासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरते, असे नमूद करुन चहल पुढे म्हणाले की, मुंबई महानगरातील विविध शासकीय यंत्रणांच्‍या भूखंडांवर राडारोडा (डेब्रीज) टाकला जात असल्याने विद्रूपीकरण होत आहे, त्यास आळा घालावा. महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणेने विविध ठिकाणी सीसीटीव्‍ही बसवावेत, स्‍थानिक पोलिस प्रमुख आणि महानगरपालिकेचे सहायक आयुक्त यांनी प्राधान्‍याने लक्ष द्यावे. अतिक्रमण निर्मूलनकामी प्रभावी ठरलेली बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडील RETMS माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्‍याकामी इतर शासकीय संस्‍थांनी देखील पुढाकार घ्‍यावा, असे आवाहनही आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.