सरकारी रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर औषधापुरतेच: गर्भवती तसेच मुलांचे हाल!

116

सरकारी रुग्णालंयात आता औषधापुरतेच तज्ज्ञ डाॅक्टर असल्याचे समोर आले आहे. प्रसूतीपासून ते लहान मुलांची काळजी घेण्यापर्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे तज्ज्ञ डाॅक्टरच रुग्णालयांत नसल्याने गर्भवती तसचे लहान मुलांचे उपचार वेळेवर होत नाहीत.

उपचाराविना बेहाल

राज्यभरातील रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक तसचे बाल रोग तज्ज्ञ यांची तब्बल 75 टक्के जागा रिक्त आहेत. अनेक रुग्णालयांत जेमतेम 170 तज्ज्ञांची नेमणूक झाल्याचे दिसून येते. यातील काही जण तर महिना महिना भर रुग्णालयांत फिरकत नाहीत. त्यामुळे गर्भवती आणि लहान मुलांचे उपचाराविना हाल होत असल्याची परिस्थिती आहे.

( हेही वाचा: किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, पिता- पुत्रांच्या अडचणीत वाढ! )

प्रशासनाचे दुर्लक्ष 

कोरोना साथीच्या काळात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध न झाल्याने प्रसूती गुंतागुतीची असूनही गर्भवतीला घरीच राहावे लागल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. या काळात महिला, मुली आणि बालकांच्या आरोग्याकडे स्थानिक आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्ररी आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये ही माहिती जाहीर झाली असून, ही पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीच्या घोषणा कागदोपत्रीच आहेत. आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची हमी देणा-या यंत्रणांनी स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची 50 टक्के पदेही भरलेली नाहीत. आरोग्य खात्यातील पदे भरण्याबाबत पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.