बद्रीनाथ महामार्ग वाहून गेल्याने तब्बल एक हजार भाविक अडकले

154
बद्रीनाथ महामार्ग वाहून गेल्याने तब्बल एक हजार भाविक अडकले

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगरी राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, दरड कोसळणे यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग (२०० मीटर) वाहून गेल्याने एक हजारपेक्षा अधिक भाविक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

(हेही वाचा – Hindustan Post Impact : दादरच्या गोलदेवळाभोवतीचा खड्डयांचा विळखा अखेर सुटला)

हिमाचल प्रदेशात जूनपासून ढगफुटीच्या जवळपास ३५ घटना घडल्या आहेत. तर गेल्या २४ दिवसांत २७ वेळा ढगफुटी झाली आहे. पुरामुळे १५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६०६ घरांची पडझड झाली असून ५३६३ घरांचे नुकसान झाले आहे.

दिल्लीत देखील पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदी अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. दिल्लीत आज (मंगळवार २५ जुलै) सकाळी यमुनेची पाणीपातळी २०५.४५ एवढी नोंदवण्यात आली. यासोबतच हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात मुसळधार आणि मध्यप्रदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.