उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ (North Mumbai Lok Sabha) काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्याने मागील काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचाराला लागलेल्या घोसाळकर कुटुंबांला उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर आणि त्यांची सुन तेजस्वी घोसाळकर यांनी या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तसेच धार्मिक स्थळांना भेटी देऊन एकप्रकारे अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली. परंतु हा मतदार संघच काँग्रेसला सोडण्यात आल्याने घोसाळकर कुटुंबाला ही उमेदवारी मिळण्याचे दरवाजे बंद झाले आहे. त्यामुळे एकप्रकारे ठाकरेंनी घोसाळकरांना केवळ गाजर तर दाखवले नाही असा असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (North Mumbai Lok Sabha)
शिवसेना उबाठा पक्षाने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई या चार लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्यावतीने आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळे उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ (North Mumbai Lok Sabha) काँग्रेस पक्षाला सोडले जाण्याची शक्यता असतानाच उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे संकेत देत प्रचाराला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, विनोद घोसाळकर आणि तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी संपूर्ण लोकसभा मतदार संघातून कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेण्यास सुरुवात केली होती. तसेच धार्मिक स्थळांना भेट देऊन आशिर्वाद घेण्याचा प्रयत्नही केला होता. (North Mumbai Lok Sabha)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदान कार्ड नाही तरी करता येणार मतदान; आधार, पॅनकार्डसह 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य)
या नावांची जोरदार चर्चा
त्यामुळे एकाबाजुला या मतदार संघातून घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केलेली असतानाच आता हा मतदार संघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घोसाळकर यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे. मात्र, काँग्रेसच्या वाट्याला ही जागा येणार असल्याने जिल्हाध्यक्ष कालू बुदेलिया आणि चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदार संघातून माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस या मतदार संघ आपल्याकडे राखतो की घोसाळकर यांच्यासाठी हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याची घोषणा मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (North Mumbai Lok Sabha)
दरम्यान बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीला वर्षा गायकवाड अनुपस्थित राहिल्या, त्यामुळे ही बैठकच रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे नाराज वर्षा गायकवाड या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे आधीच काँग्रेसचे पदाधिकारी नाराज असून मुंबईतील सर्वच जागा शिवसेनेने घेऊन टाकावे असा त्रागा व्यक्त केला जात आहे. त्यातच आता ही नाराजी आता उघडपणे झाल्याने उत्तर मुंबई शिवसेनेला सोडला जातो की काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (North Mumbai Lok Sabha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community