Chandrayaan – 3 : पंतप्रधानांनी चंदामामा म्हटल्याबरोबर नेटकऱ्यांनी पृथ्वी आणि चंद्राचे केले रक्षाबंधन

340

Chandrayaan – 3 चे यशस्वीरीत्या चंद्रावर लँडिंग झाले आहेत आणि याबाबत प्रधानमंत्री यांनी भावुक होऊन एक सुंदर भाष्य केले. त्यांनी सांगितले कि, “प्रत्येक भारतीयावर हे संस्कार आहेत, आपण भारतात धरतीला माता म्हणून आणि चंद्राला चांदामामा म्हणून संबोधित करतो. लहानपणीच्या कथा- कवितांमध्ये चंदोमामाचा बराच उल्लेख केला आहे. त्याकारणाने आपल चंद्रा सोबतच नातं, हे प्रेमाचा आणि आपुलकीचा आहे.

अशाच या नात्याला नेटक-यांनी ट्वीटरवर भरभरून प्रतिसाद दिला. पत्रकार रुबिका लियाकत यांनी धरती आणि चंद्राचे एक व्यंग चित्र ट्विटर वर पोस्ट करत असताना म्हटले की, ‘किती अप्रतिम छायाचित्र आहे, धरती माताने चंद्र यानाची राखी बनवून चंदोमामाला बांधली आहे. हे असे रक्षाबंधनाचे नाते असल्यास यश निश्चित आहे.’

(हेही वाचा Chandrayaan Mission Success : चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा – मुख्यमंत्री शिंदे)

केंद्रीय मंत्री स्मृर्ती इराणी यांनीही ट्विटरवर चंद्रयान लँडिंग झाल्यानंतर जिल्ह्यातला एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एका खोलीत लहान मुले, चंद्रयान-३च्या लँडिंग झाल्यावर टाळ्या वाजवून आनंद साजरा करत होते, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

माध्यमांशी बोलत असताना अभिनेता अनुपम खेर म्हणतात, ‘माझ्या आयुष्यात यापेक्षा आनंदाचा कोणताही क्षण आला नाही. आम्ही लहानपणी ‘चंदा मामा दूर के’ गाायचो, पण ते आता दूर नाही. मी आज राष्ट्राला नतमस्तक करून अभिवादन करतो, विशेषत: इस्रोच्या वैज्ञानिकांना त्यांचे यश मिळाले म्हणून मी त्यांना सलाम करतो…हा इतिहास आहे…आज पृथ्वीवर किती भारतीय चंद्राकडे पाहत असतील ही कल्पना कोणी करू शकत नाही. जे पाहत असतील ते असे आवर्जून म्हणतील, ‘बघा तो रोव्हर भारतीय आहे’. आम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचलेले पहिले राष्ट्र आहोत. आम्ही पहिले लोक आहोत जे तिथे उतरलो.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.