यंदा पावसाचा जोर कमी असला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी मुंबई त्रस्त झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. झोपडपट्टीमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होते असे म्हंटले जाते. पण खुद्द जे. जे. इस्पितळात (J J hospital) देखील मोठ्याप्रमाणात सुरू असलेल्या बांधकामामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून त्यामुळे डॉक्टरच डेंग्यू मुळे आजारी असल्याचे समोर आले आहे. (J J hospital)
जे. जे. इस्पितळात (J J hospital) ३०० निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचे पाणी जमा राहिल्याने त्यावर डासांची पैदास झाली आहे. त्यामुळे डॉक्टरच डेंग्यूने आजारी होऊन इस्पितळात भरती झाले आहेत. जे. जे. मध्ये शिकण्यासाठी आलेले १० ते १२ डॉक्टर डेंग्यूने आजारी असल्याचे समोर आले आहे. या ३०० निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात ६०० पेक्षा अधिक डॉक्टर राहतात. इस्पितळातच आणि डॉक्टरांना आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी राहावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार्डिओलॉजी डिपार्टमेंट मधील दोन डॉक्टर डेंग्युच्या आजाराने इस्पितळात भरती आहेत. (J J hospital)
(हेही वाचा – Rajasthan Legislative Assembly : अशोक गहलोत यांच्या विरोधात वसुंधरा राजे?)
संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे १,३२३ तर डेंग्यूचे १,३६० रुग्ण आढळल्याने मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा बसला आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, कावीळ व चिकनगुनिया या साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत १६ लाख १८ हजार २५० घरांची झाडाझडती घेतली असून ८ लाख ९१ हजार २५० लोकांचे सर्वेक्षण केले. यात १ लाख ३३ हजार २७८ जणांचे रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (J J hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community