काश्मीरच्या टोकाला असलेल्या लडाख प्रदेशात आज जरी मोकळे आणि सुरक्षित वातावरण निर्माण झाले असले तरी मागील अनेक दशके तेथील सामाजिक परिस्थिती तितकीशी पुढारलेली राहिली नाही, त्यामुळे त्याचा परिणाम तेथील शैक्षणिक परिस्थितीवरही झाला. अशा वेळी येथील मुलांना विज्ञानासारखा विषय शिक्षणात शिकायला मिळणे तसे दुरापास्तच आहे. साहजिकच येथील मुलांना विज्ञाना सारख्या विषयाची भीती वाटते. ही भीती दूर करून या भागातील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न पुण्यातील असीम फाउंडेशनने केला आहे.
असीम फाउंडेशनने उपरोक्त उद्देशासाठी लडाख येथील दृक पद्मा कार्पो स्कुल या शाळेत सायन्स पार्क उभारले आहे. त्याचे उदघाटन २३ एप्रिल रोजी होणार आहे. लडाखमध्ये हे पहिलेच सायन्स पार्क आहे. असीम फाउंडेशन वर्ष २०१२ पासून या ठिकाणी कार्यरत आहे. २०१४ सालापासून दरवर्षी या शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेऊन त्यांना उच्च शिक्षित केले जात आहे.
अशा रीतीने अनेक जण आता चांगल्या हुद्यावर गेले असून ते लडाखच्या विकासासाठी हातभार लावत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातून विज्ञान विषयाची भीती घालवणे आणि हसत-खेळत त्यांनी विज्ञान विषय शिकावा, असा उद्देश या मागे असीम फाउंडेशनचा आहे, अशी माहिती असीम फाउंडेशनचे प्रमुख सारंग गोसावी यांनी दिली. दृक पद्मा कार्पो स्कुल ही तीच शाळा आहे, ज्यामध्ये अमीर खानच्या ‘थ्री इडिएट’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते.
(हेही वाचा तुमच्या मुलाची शाळा खरी आहे ना? तपासून पहा… मुंबईत आहेत ‘एवढ्या’ बोगस शाळा)
Join Our WhatsApp Community