Shaurya 2.0 : महावीर चक्र, वीर चक्र विजेत्यांविषयी माहिती आहे का?; असीम फाऊंडेशनने आणला अभिनव खेळ

Shaurya 2.0 मध्ये खेळणाऱ्याने समोरच्या खेळाडूकडील वीर योध्यास अचूक होकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नांनी ओळखायचे आहे. एका संचामधून महावीर चक्र (Maha Vir Chakra) आणि वीर चक्र (Vir Chakra) विजेत्या २० योध्यांची ओळख होते.

182
Shaurya 2.0 : महावीर चक्र, वीर चक्र विजेत्यांविषयी माहिती आहे का?; असीम फाऊंडेशनने आणला अभिनव खेळ
Shaurya 2.0 : महावीर चक्र, वीर चक्र विजेत्यांविषयी माहिती आहे का?; असीम फाऊंडेशनने आणला अभिनव खेळ

आजकाल मुलांना अनेक प्रकारच्या कार्टून्सची नावे तोंडपाठ असतात; परंतु देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन काम करणाऱ्या सीमेवरच्या सैनिकांची ओळख कुणाला नसते. सीमेवरील सैन्याचे अतुलनीय शौर्य आणि त्याग यांची देशवासीयांना ओळख होण्यासाठी असीम फाऊंडेशनने (Aseem Foundation) अनोखा खेळ तयार केला आहे. हा पत्त्यांचा खेळ आहे. असीम फाऊंडेशनच्या शौर्य २.० (Shaurya 2.0) खेळाचे नुकतेच लष्कराच्या दक्षिण कमानीच्या प्रमुखांच्या (Southern Command) हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

(हेही वाचा – तुरुंगातून सुटका नाही! हायकोर्टाचा मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना दणका)

काय आहे शौर्य २.० ?

शौर्य २.० मध्ये खेळणाऱ्याने समोरच्या खेळाडूकडील वीर योद्ध्यास अचूक होकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नांनी ओळखायचे आहे. दोन खेळाडूंकडे ३ संच असतात. प्रत्येक खेळाडूकडे १-१ संच असतो. तिसऱ्या संचातून एक एक कार्ड काढून समोरच्या खेळाडूला ते कार्ड विविध प्रश्न विचारून ओळखायला लावायचे आहे. या कार्डवर तो योद्धा कुठे लढला?, किती उंचीवर ते युद्ध झाले?, युद्धाच्या वेळी वीराचे वय काय होते?, ही सर्व माहिती मिळते.

१५४८ संच वितरणाचा संकल्प

Shaurya 2.0 हा पहिला संच आहे, असे १० संच असीम फाऊंडेशन बनवणार आहे. एका संचामधून महावीर चक्र (Maha Vir Chakra) आणि वीर चक्र (Vir Chakra) विजेत्या २० योद्ध्यांची ओळख होते. एकूण २१३ महावीर चक्र आणि १३३५ वीर चक्र विजेते आहेत. २६ जुलै रोजी येणाऱ्या कारगिल युद्धाच्या विजयोत्सवात त्यातील प्रत्येकास स्मरून एक असे किमान १५४८ संच २६ जुलैपर्यंत विक्री करण्याचा असीम फाऊंडेशनचा मानस आहे, अशी माहिती ‘असीम’चे सारंग गोसावी यांनी दिली आहे.

कुठे मिळेल Shaurya 2.0 ?

Shaurya 2.0 खेळाचा एक संच ५०० रुपयांचा आहे. तो असीम फाऊंडेशनच्या www.aseemfoundation.org या बेवसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.