आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरनगरी (Pandharpur) हरिनामाच्या गजरात रंगली आहे. एकादशीच्या निमित्ताने पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा (Shri Vitthal Rukmini Mahapuja) संपन्न झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) (मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक) यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत. (Ashadhi Ekadashi 2024)
(हेही वाचा – उत्तर प्रदेशात Muslim मौलानाची घोषणा; २३ हिंदू तरुण-तरुणींचे धर्मांतर करणार; निकाह लावणार)
यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करण्याचे सौभाग्य मिळणे हा माझ्यासाठी बहुमान ठरला. https://t.co/yqiDz58MG1 pic.twitter.com/usu2D2yu5N
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 17, 2024
राज्यातील जनता सुखी होऊ दे – मुख्यमंत्र्यांनी केली प्रार्थना
मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी होई दे. या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे, हे मागणे मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले की, आज सगळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, असं मागणं मी विठ्ठलाला मागितलं आहे. हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचं भाग्य लाभले आहे. आपण सर्वजण वारकऱ्यांची भगवी पताका फडकत ठेवत आहात, त्याबद्दल आपले सर्वाचं आभार, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Ashadhi Ekadashi 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community