Ashadhi Ekadashi 2024 : वारीला जात आहात ? टोलमाफीसाठी कुठे आणि कसा कराल अर्ज ?

Ashadhi Ekadashi 2024 : टोलमाफीचा लाभ मिळवण्यासाठी वाहन मालकांना वाहनाची कागदपत्रे घेऊन जवळचे आरटीओ कार्यालय गाठावे लागणार आहे.

88
Ashadhi Ekadashi 2024 : वारीला जात आहात ? टोलमाफीसाठी कुठे आणि कसा कराल अर्ज ?
Ashadhi Ekadashi 2024 : वारीला जात आहात ? टोलमाफीसाठी कुठे आणि कसा कराल अर्ज ?

आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरची यात्रा चालू झाली आहे. २ जुलै या दिवशी पुण्यातून पालखी पुढे सासवडच्या दिशेने निघाली असून येत्या काही दिवसांत राज्यभरातून पंढरपूरकडे वाहने मोठ्या प्रमाणात येणार आहेत. या वारकऱ्यांच्या वाहनांना राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे टोलमाफी जाहीर केली आहे. वारकऱ्यांना ३ जुलैपासून २१ जुलैपर्यंत याची मुदत ठेवण्यात आली आहे. (Ashadhi Ekadashi 2024)

(हेही वाचा – Death of Young Badminton Player : युवा बॅडमिंटनपटूच्या मृत्यूची बॅडमिंटन संघटना करणार चौकशी)

या टोलमाफीचा लाभ मिळवण्यासाठी वाहन मालकांना वाहनाची कागदपत्रे घेऊन जवळचे आरटीओ कार्यालय गाठावे लागणार आहे. वारकऱ्यांना टोलनाक्यावर आरटीओने दिलेला पास, स्टीकर दाखवावा लागणार आहे. यानंतरच वाहन सोडले जाणार आहे. या पास स्टीकरशिवाय वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार नाही.

कशी मिळवावी टोलमाफी ?

२०२२ मध्ये राज्य सरकारने पहिली टोलमाफी जाहीर केली होती. आधी जीआर दाखवा मग पाहू; असे म्हणत टोल आकारण्यात येत होता. तसाच प्रकार २०२३ मध्येही घडला होता. वारकऱ्यांना नेमकी टोलमाफी कशी घ्यावी, याची योग्य माहितीच दिली जात नव्हती. यंदा खूप लवकर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जे वाहनाने जाणारे वारकरी आहेत त्यांच्याकडे कारचे आरसी, पीयुसी, इन्शुरन्स ही कागदपत्रे असतील, तर आरटीओत जाऊन अर्ज भरून टोलमाफी घेण्याची संधी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गरज असेल, तर अवजड वाहतूक थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

फास्टॅगमध्ये पैसे असतील तर…

जर तुमच्या फास्टॅगमध्ये पैसे असतील आणि टोलमाफीचा पास मिळाला असेल, तर तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. एकतर फास्टॅगवर अॅल्युमिनिअम फॉईल चिकटवावी लागेल किंवा आतून स्क्रीन ऑन केलेला मोबाईल धरावा लागणार आहे. असे केल्यासच टोल नाक्यावरील स्कॅनरद्वारे तुमचा फास्टॅग स्कॅन होणार नाही व पैसे कापले जाणार नाहीत. (Ashadhi Ekadashi 2024 )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.