Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल- आषाढी एकादशीचे काय आहे महात्म्य?

200
Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल- आषाढी एकादशीचे काय आहे महात्म्य?
Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल- आषाढी एकादशीचे काय आहे महात्म्य?

हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संपूर्ण वर्षभरात चोवीस एकादशी असतात. पण ज्या वर्षी अधिकमास येतो त्या वर्षी एकादशीची संख्या २६ होते. आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. काही ठिकाणी या तिथीला ‘पद्मनाभ’ असंही म्हटलं जातं. (Ashadhi Ekadashi 2024)

ज्या तिथीला सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो त्या तिथीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असं म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शयानावस्थेत जातात आणि त्यानंतर चार महिन्यांनी सूर्य मिथुन राशीतून तूळ राशीत प्रवेश करतो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू जागे होतात. त्या दिवसाला देवउठी एकादशी असं म्हणतात. या दोन्ही एकादशींच्या मधल्या अंतराला चातुर्मास असं म्हणतात. (Ashadhi Ekadashi 2024)

(हेही वाचा- Kanchanjunga Express चा अपघात का घडला ? काय सांगतो रिपोर्ट)

◆देवशयनी एकादशीचं काय महत्त्व आहे?

●या एकादशीला सौभाग्याची एकादशी असंही म्हणतात. पद्म पुराणात असं म्हटलं आहे की, देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रत किंवा उपवास केला तर जाणूनबुजून किंवा अनावधानाने केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते.

●या दिवशी मनापासून आणि पद्धतशीरपणे पूजा केली तर स्त्रियांना मोक्ष प्राप्ती होते. ब्रह्मवैवर्त पुराणात असं म्हटलं आहे की, देवशयनी एकादशीचे व्रत केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात.

●शास्त्रानुसार चातुर्मासाच्या काळामध्ये १६ संस्कारांपैकी कोणतेही विधी केले जाऊ शकत नाही. पण या काळामध्ये पूजा, विधी, घर किंवा ऑफिसची दुरुस्ती, गृहप्रवेश, वाहन खरेदी आणि दागिन्यांची खरेदी करता येते.

◆देवशयनी एकादशीचं व्रत करण्याची पद्धत

देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरात झाडलोट करावी. घराची फरशी स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर स्नानादी आटोपून घरात गोमूत्र शिंपडावे. घरातल्या देव्हाऱ्यात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी भगवान श्री हरी विष्णूची धातूची मूर्ती ठेऊन तीची षोडशोपचार पूजा करावी. (Ashadhi Ekadashi 2024)

(हेही वाचा- Virat vs Gambhir : विराट आणि गंभीर यांच्यात आयपीएल दरम्यान नेमकं काय झालं होतं?)

त्यानंतर व्रत कथा ऐकावी. आणि आरती करून प्रसाद वाटावा. मग शेवटी श्रीविष्णूंना त्यांच्यासाठी तयार केलेल्या पलंगावर पांढरी चादर, पांघरूण, गादी आणि उशा घालून निजवावे. (Ashadhi Ekadashi 2024)

संपूर्ण चातुर्मासात व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इच्छेनुसार दैनंदिन व्यवहारातील गोष्टींचा त्याग करावा किंवा त्या वस्तू ग्रहण कराव्यात. जसे की, गोड वाणीसाठी गूळ, दीर्घायुष्यासाठी किंवा पुत्र प्राप्तीसाठी तेल, शत्रूच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी कडवे तेल, नशीब चमकवण्यासाठी साठी गोडे तेल, स्वर्गप्राप्तीसाठी फुलांचा प्रसाद असावा. (Ashadhi Ekadashi 2024)

(हेही वाचा- Ashadhi Ekadashi 2024 : …तेव्हा मात्र भीती वाटते; Raj Thackeray यांनी पांडुरंगाच्या चरणी कोणती प्रार्थना केली ?)

शक्यतोवर भगवान श्रीहरी विष्णूंच्या शयन काळामध्ये सर्व प्रकारची शुभकार्ये करण्याची टाळा. याव्यतिरिक्त दैनंदिनी आयुष्यात पलंगावर झोपणं, पत्नीचा सहवास करणं, खोटं बोलणं, मांस, मध, दुसऱ्यांनी दिलेले दही-भाताचं सेवन करणं नक्कीच टाळा. भाज्यांमध्ये मुळा, वांगी इत्यादी खाणंदेखील टाळावं. (Ashadhi Ekadashi 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.