Ashadhi Ekadashi Yatra : आषाढी यात्रेनिमित्त एसटीच्या ५ हजार विशेष बस सोडणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

156
Ashadhi Ekadashi Yatra : आषाढी यात्रेनिमित्त एसटीच्या ५ हजार विशेष बस सोडणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi Yatra) श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी येत असतात. वारक-यांना सोयीचे व्हावे यासाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष बस सोडाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २७ जुन रोजी २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Ekadashi Yatra) एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Shri Trimbakeshwar Temple : श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण : मुसलमानांचा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; मंदिर प्रशासनाचे पत्र)

आषाढी यात्रा (Ashadhi Ekadashi Yatra) हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Ekadashi Yatra) मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे ५ हजार गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

आषाढी निमित्त (Ashadhi Ekadashi Yatra) राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.