आषाढी यात्रेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर दिनांक १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर ते मिरज दरम्यान आषाढी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : आता बॅंकेच्या पासबुकवर लागणार १८ टक्के GST! कोणत्या वस्तू महागणार? वाचा यादी )
विशेष गाड्या
- गाडी क्रमांक 01147 ही विशेष ट्रेन पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी १३.३५ वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १६.५० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01148 ही विशेष गाडी दिनांक १० जुलै २०२२ रोजी मिरज येथून १८.१५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल.
थांबे: सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सुलगरे आणि आरग.
संरचना: ४ शयनयान, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि १ जनरेटर व्हॅन.
- गाडी क्रमांक 01149 विशेष पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी ०४.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी ०७.३० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01150 विशेष गाडी दिनांक १० जुलै २०२२ रोजी मिरज येथून १८.४५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी २१.४० वाजता पोहोचेल.
थांबे: सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सुलगरे आणि आरग.
संरचना: २ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण:
- सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह वरील विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू आहे.
- या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.