जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दौंड तालुक्यातील बेलवाडी येथे पार पडले. काटेवाडीतील पाहुणचार आटपून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सनसरमध्ये रात्री मुक्काम केला. मागच्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण अनुभवण्याची संधी गावक-यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करुन या ठिकाणी बसले होते.
सुरुवातील विणेकरी, टाळेकरी त्यानंतर मृदुंगवाले त्यानंतर तुळशी वृदांवन घेतलेल्या महिला यांनी अगोदर प्रदर्शना घातली आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचे अश्व याच ठिकाणाहून धावले आणि एकच ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष झाला.
( हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंचं पहिलं ट्विट )
आषाढीची पूजा फडणवीसच करणार
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनाधार हा भाजपला मिळाला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने तयार झाले आणि आज तेच विश्वासघाताची भाषा करत आहेत. त्यांना ते शोभत नाही. त्यामुळे ते आता सत्तेतून पायउतार होतील, असा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे, असे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.