पंढरपूरची यात्रा, संताचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी परंपरा आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मंडळी विठू नामाचा गजर करत मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. दरम्यान, पालखी विठ्ठल…विठ्ठल…माऊली..माऊली चा जयघोष करत असून, राज्यभरातून अनेक पालख्या पंढरपूरच्या जवळ पोहोचल्या आहेत. दरम्यान, आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi, Solapur) गुरूवारी (११ जुलै) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धर्मपुरी (ता. माळशिरस) येथून सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला. (Ashadhi Wari 2024)
(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : ती वाघनखं छत्रपती शिवरायांचीच? सुधीर मुनगंटीवार म्हणाले…)
दरम्यान, या पालखीचे स्वागत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकात पाटील (Higher and Technical Education Minister and Guardian Minister Chandrakat Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी सोहळ्यातील आश्वानचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी खा. धैर्यशील मोहिते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Collector Kumar Ashirwad), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर आदी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Ashadhi Wari 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community