Ashadhi Wari 2024: विठूरायांच्या भक्तांसाठी खुशखबर! आषाढीसाठी लालपरीच्या ५००० बस धावणार

गावातून ४० किंवा जास्त भाविक असतील तर त्यांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून  एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असं आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

92
Ashadhi Wari 2024: विठूरायांच्या भक्तांसाठी खुशखबर! आषाढीसाठी लालपरीच्या ५००० बस धावणार

यंदा आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदांची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) आषाढी यात्रेनिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. एसटीने आषाढी यात्रा काळात ५ हजार विशेष बस (5 Thousand ST Special Bus) सोडण्याचं नियोजन केलं आहे. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा जास्त भाविक असतील तर त्यांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून  एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. (Ashadhi Wari 2024)

(हेही वाचा – MSRTC मधील विनंती बदल्या संगणकीय ॲपव्दारे होणार)

यात्रा काळात गर्दीचा फायदा घेत तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत. रस्त्यावर कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होऊ नये म्हणून स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बस सोडल्या होत्या. याद्वारे १८ लाख ३० हजार ९३४ प्रवाशांची एसटीने ने-आण केली होती. (Ashadhi Wari 2024) 

 (हेही वाचा- Shardul Thakur : शार्दूल ठाकूरच्या घोट्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया )

एका गावातून ४० पेक्षा अधिक भाविक असल्यास गावातून थेट एसटी

सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींसोबत चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Ashadhi Wari 2024)

बसस्थानकाचे नाव     जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस 

चंद्रभागा –                  मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

भीमा यात्रा देगाव –        छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती प्रदेश

विठ्ठल कारखाना –        नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

पांडुरंग बसस्थानक –     सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.