Ashadhi wari 2024: ज्ञानोबा-तुकोबारायांची पालखी पुण्यात मुक्कामी

206
Ashadhi wari 2024: ज्ञानोबा-तुकोबारायांची पालखी पुण्यात मुक्कामी
Ashadhi wari 2024: ज्ञानोबा-तुकोबारायांची पालखी पुण्यात मुक्कामी

शुक्रवारी देहूवरुन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज (Shri Sant Tukaram Maharaj Palkhi) तर शनिवारी आळंदीहून जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर माऊली (Shri Sant Dnyaneshwar Mauli Palkhi) यांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून रविवारी दोन्ही पालख्या संध्याकाळपर्यंत पुणे शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. तर सोमवारी पुणे शहरात मुक्कामी असणार आहे. दरम्यान पुणे शहरात दिवसभर माऊली-माऊली नामाचा गजर सुरू होता. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. तसेच वाहतूक विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी देखील करण्यात आली आहे. (Ashadhi wari 2024)

(हेही वाचा – 2024 Reasi Attack : एनआयएची छापेमारी; हकम खानच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर)

आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायवारीत  सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीसह पुण्यात दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर, तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका अशा भक्तिमय वातावरणात रविवारी (३० जून) रोजी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले. यंदा मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित आहेत. यंदाचा हा ३३९ वा पालखी सोहळा असून पुण्यात ठिकठिकाणी वारकरी दाखल झाले आहेत. त्यांचं स्वागत देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर इथे जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी असणार आहे. तसेच २ जुलै रोजी तुकोबारायांची पालखी लोणी काळभोर कडे रवाना होईल तर ज्ञानोबारायांची पालखी सासवडच्या दिशेन रवाना होईल.     (Ashadhi wari 2024)

(हेही वाचा – Roads in Border Areas : सीमा भागात 15,520 किमीचे रस्ते नेटवर्क उभारणार; देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारचे उद्दिष्ट)

पुण्यात वारकऱ्यांसाठी विशेष सोय

पुणे शहरात पालखी मुक्कामी असताना मोठ्या प्रमाणावर वारकरी हे येत असतात. याच दरम्यान पुण्यात वारकऱ्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी वारकऱ्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच पावसाच्या अनुषंगानं देखील सभा मंडप तसंच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात वारकरी मुक्कामी असतात, त्या त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी ई-टॉयलेट देखील ठेवण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ नये, याची देखील खबरदारी घेण्यात येत आहे. (Ashadhi wari 2024)

हेही पाहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.