आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ (arogyachi wari pandharichya dari) हा उपक्रम राबवीत आहे. वारीमध्ये 17 जुलै पर्यंत 13 लाख 96 हजार 072 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Minister Dr. Tanaji Sawant) यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला. (Ashadhi Wari 2024)
संत श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Shri Dnyaneshwar Maharaj), श्री संत तुकाराम महाराज (Shri Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला तर लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक पाच किलोमीटरवर एक आपला दवाखाना तयार करण्यात आला होता. वारी दरम्यान 6 हजार 368 आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या. तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून 2,327 रुग्णांवर उपचार करण्यात आले. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 5 खाटांचे तात्पुरते अति दक्षता विभाग (आयसीयू) सज्ज ठेवण्यात आले होते. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. (Ashadhi Wari 2024)
(हेही वाचा – मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी Hindu मुलाला जिवंत जाळले)
या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर ताप, सर्दी, खोकला, ड्रेसिंग, जुलाबचा त्रास झाल्यास सेवेसाठी दुचाकी रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी रुग्णवाहिका फिरू शकत नाही. त्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. (Ashadhi Wari 2024)
फिरत्या रुग्णवाहिकेबरोबरच 102 व 108 या रुग्णवाहिकाही पालखी मार्गावर सेवा देत होत्या. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आले होते. रुग्णवाहिकेबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती.
(हेही वाचा – तुमच्या आधार कार्डवर किती सिम सक्रिय आहेत आणि ते कसे निष्क्रिय करायचे? जाणून घ्या)
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात आलेली सेवा
- प्रत्येक 5 किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’- 258
- वारी दरम्यान 102 व 108 रुग्णवाहिका 24 बाय 7 उपलब्ध – 707
- दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – 5885
- महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – 136
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना –136
- पालखी मार्गावर आरोग्य दूत –212
- पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – 9
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 5 खाटांची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – 87
- आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community