Ashadhi Wari : ‘जय हरी विठ्ठल’ च्या गजरात वारकरी तल्लीन; राजधानीतील वारीला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

217
Ashadhi Wari : 'जय हरी विठ्ठल' च्या गजरात वारकरी तल्लीन; राजधानीतील वारीला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भगव्या पताका.. झेंडे.. टाळ मृदुंगावर विठ्ठलाच्या भजनाचा निनाद… पांढऱ्या वेशातील वारकरी…. ओथंबून वाहणारा भक्तीचा सोहळा याची देह याची डोळा बुधावार (१७ जुलै) आषाढी एकादशीच्या दिवशी दिल्लीकर मराठी बांधवांनी अतिशय उत्साहात अनुभवला. पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी असलेली आतुरता मराठी दिल्लीकरांच्या डोळ्यांत दिसत होती. कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरातून सकाळी वारीला सुरुवात झाली. त्यानंतर आर. के. पुरम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारीचा समारोप करण्यात आला. (Ashadhi Wari)

वारी दरम्यान ठिकठिकाणी पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी वारीदरम्यान मार्गदर्शन केले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा तसेच अभिषेक केला. खासदार मनोज तिवारी, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे तसेच अनेक मान्यवरांनी वारी दरम्यान भेट दिली. यावेळी दिल्लीमधील मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ashadhi Wari)

(हेही वाचा – Ashadhi Wari शांत, समावेशक परंतु रामनवमी, हनुमान जयंती शोभायात्रा हिंसक; इरफान इंजिनियर यांच्याकडून हिंदू धर्माचा अवमान)

पालखी सह बच्चे कंपनी आनंदाने विठू नामाचा गजर करीत होती. आषाढ महिना आला की वारकऱ्यांना वेध लागतात वारीचे. विठू माऊलीच्या दर्शनाचे. मात्र महाराष्ट्र बाहेर राहत असलेल्या मराठी माणसाला आपण विठ्ठलाला भेटू शकत नसल्याची रुखरुख राहते. हीच मराठी मनातील भावना लक्षात घेऊन दिल्ली मराठी प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून दिल्लीत सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात येते. यात दिल्लीकर मराठी मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी होतात. आर. के. पुरम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारीचा कीर्तन, भजन आणि प्रसाद ग्रहण करून वारीचा समारोप झाला. वारीचा प्रस्थान मार्ग हनुमान मंदिर, कॅनॅाट प्लेस, बाबा खडकसिंह मार्ग गोल डाकखाना, डॉ. राम मनोहर लोहिया हॅास्पिपटल, ११ मूर्ती, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, शांतीपथ, मोतीबाग फ्लायओव्हर, राव तुलाराम मार्ग, मेजर सोमनाथ पथ, संगम सिनेमा, तमिल संगम, विठ्ठल मंदिर, रामकृष्ण पुरम असा होता. (Ashadhi Wari)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.