Ashish Shelar : मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा; अॅड. आशिष शेलार यांची मागणी

फसलेल्या २४ तास पाणी योजनेची चौकशी करा

155
सामनातील पंतप्रधानांच्या टीकेवरुन Ashish Shelar यांचा राऊतांवर पलटवार

मुंबई महापालिकेमध्ये एकाच परिवाराची सत्ता गेली २५ वर्षे असून त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही, झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्त्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुंबई महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला असून या योजनेतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी (२८ फेब्रुवारी) विधानसभेत केली. (Ashish Shelar)

विधानसभेत आज सत्ताधारी पक्षातर्फे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, या शहरांमध्ये महायुती सरकारतर्फे करण्यात आलेली कामे आणि गतिमान विकास याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आभार मानुन नियम २७० नुसार मुंबईची चर्चा उपस्थितीत करणारा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाची मांडणी करताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईकरांच्या अजूनही काही अपूर्ण राहिलेल्या अपेक्षांकडे सरकारचे लक्ष वेधले. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Railroad Project: नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता, वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग)

शेलारांनी या योजनेच्या चौकशीची केली मागणी 

मुंबई आज शहर आणि उपनगरात असमान पाणीपुरवठा होत आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रचंड तुटवडा मुंबईला जाणवत आहे, या पाणीपुरवठ्याचे मुंबई महापालिकेने गेल्या २५ वर्षात ३० हजार कोटी रुपये मुंबईकरांकडून करापोटी वसूल केले. एकाच परिवाराची सत्ता या महापालिकेत आहे, त्यांचाच महापौर, त्यांचीच स्थायी समिती, त्यांनीच निर्णय घेतले तरीही मुंबईकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे येत्या एक महिन्यात या सगळ्याचा हिशोब देणारी श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी आमदाराची शेलार (Ashish Shelar) यांनी केली. (Ashish Shelar)

महापालिकेतर्फे मुलुंड आणि वांद्रे पश्चिम म्हणजे एच पश्चिम या दोन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी ४०० कोटी रुपये केवळ कन्सल्टंटला देण्यात आले या ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून उबाठा याला जबाबदार असून या प्रकरणांमध्ये कुठला गैरव्यवहार झाला? याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. (Ashish Shelar)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : अंगणवाडीतील मुलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेस्कबॅगचे वाटप)

मुंबईचा मेगा पार्किंग प्लॅन तयार करावा – शेलार 

आघाडीचे सरकार असताना मेट्रोचे काम दोन वर्ष आरे कारशेडच्या नावावर रोखण्यात आले, आज मेट्रो सुरू झाल्यानंतर आतापर्यंत आठ कोटी लोकांनी प्रवास केला असून रोज दोन लाख ३५ हजार प्रवासी करतात, म्हणजेच उबाठाने एवढ्या सगळ्या मुंबईकरांची अडवणूक करून ठेवली होती, केवळ अहंकारापोटी आरे कारशेडचे काम अडवण्यात आले त्यामुळे १० हजार कोटीने मुंबईचा मेट्रोचा खर्च वाढला. याबाबत एक श्वेतपत्रिका काढून सरकारने नेमके किती हजार कोटीने खर्च वाढला? या काळात जी वाहनांची वाहतूक झाली त्यातून किती कार्बन उत्सर्जित झाला? प्रदूषणात किती वाढ झाली? याबाबतची माहिती मुंबईकरांना द्यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. (Ashish Shelar)

मुंबईत खासगी वाहनांची संख्या सुमारे २० लाख असून दररोज नोंदणी होणाऱ्या खासगी गाड्यांची संख्या – ११० असून मुंबईतील खासगी बसेसची संख्या – ३,५००. (शालेय बसेस – १७००) राज्यातील खासगी बसेसची संख्या – ८,०००. व्होल्वो (मुंबई) – ३०० असून एसटी संख्या – १८ हजार असून बेस्ट संख्या – ४ हजार असून रिक्षा टँक्सी असे मिळून काही लाख वाहन संख्या ही मुंबईची आहे. एवढी वाहन मुंबईत फिरतात या वाहनांच्या पार्किंगचा विचार मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला नाही. मातोश्री २ ची पार्किंग आणि प्रवेश कलानगर ऐवजी मुख्य रस्त्यातून कसा मिळेल याची व्यवस्था करणाऱ्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांना मुंबईतील पार्किंग समस्येचा प्रश्न कधीच पडला नाही. त्यामुळे आता शासनाने मुंबई महापालिकेला सांगून मुंबईचा मेगा पार्किंग प्लॅन तयार करावा अशी मागणी अशी शेलार यांनी केली. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Pune Municipal Corporation : नीलेश राणेंची मालमत्ता पुणे महापालिकेकडून सील; काय आहे कारण ?)

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे शेलारांनी यासाठी केले अभिनंदन

वांद्रे रेक्लमेश येथील एमएसआरडीसीचा भूंखड विकून वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू पुढे पालघर पर्यंत वाढविण्यात येणार आहे त्याला आमचा विरोध नाही मात्र याच जागेवर एक उद्यान उभारण्याची आमची मागणी मागील काळात शासनाने मान्य केली होती तीचा विचार करता या जागेवर आता विविध बांधकाम झाल्यानंतर शिल्लक मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. (Ashish Shelar)

विक्रोळी येथे प्रत्यक्ष सुरू झालेले बुलेट ट्रेन चे काम हे अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरणाचा पूरक आणि वेळेची बचत करणारे एक अद्भुत असे काम असून आमदारांनी प्रत्यक्ष जाऊन कधीतरी पहावे, ही एक बुलेट ट्रेन सुरू झाली की देशभर हे जाळे विणले जाईल. पण दुर्दैवाने ही बुलेट ट्रेन रोखण्याचे काम उबाठाने केले. मुंबईतील झोपडपट्टीधारकांच्या समस्या सोडवणाऱ्या, शिवडी न्हावा शेवा सेतू सागरी महामार्ग करणाऱ्या, तसेच अभ्युदयमधील घरांचा डीएनडी तत्वावर करुन रहिवाशांना तिप्पट घरे देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री अजित पवार यांचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अभिनंदन केले. (Ashish Shelar)

कोळी बांधवांच्या नुकसान भरपाईतील तफावत दूर करा

सागरी सेतूचे काम एमएसआरडीसी करीत असून कोस्टल रोडचे, अर्धे काम मुंबई महापालिका करीत आहे. या कामामुळे कोळी बांधवांचे जे नुकसान होते त्याची मोजदाद करण्याचे सुत्र दोन प्राधिकरणांचे वेगवेगळे असून ते एकच असावे. मुंबई महापालिकेच्या सूत्रानुसार कोळी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आगरी मागणी आमदार अशी शेलार यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.