मुंबईसह ठाणे, रायगडमधे झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेशमूर्ती कारखान्यांत पाणी शिरुन मोठे नुकसान झाले त्यांना शासनाने मदत करावी, अशी विनंती आमदार अँड. आशिष शेलार यांनी केली.
गणेशमूर्तीकारांच्या झालेल्या नुकसानभरपाई बाबत आमदार अँड. आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा सभागृहात उपस्थितीत केला होता. ते म्हणाले की, सरकारने आग्रह धरलेल्या शाडूच्या आणि मातीच्या गणेश मूर्तींचे राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान होत आहे.
(हेही वाचा – Steel Sector : भारत-जपानमध्ये पोलाद क्षेत्रातील सहकार्य, कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर चर्चा)
पेणमध्ये अनेक कारखान्यांत पाणी शिरुन मोठे नुकसान झाले आहे. या मूर्तीकारांना सरकारने मदत करावी तसेच पीओपीच्या मूर्तीकारांवर सुरू असणारे धाडसत्र बंद करावे, एकीकडे मुसळधार पावसामुळे पूर येऊन कारखान्यांतील शाडू मातीच्या मुर्त्या पाण्यात विरघळून गेल्या आहेत.
दुसरीकडे सरकार शाडूमातीच्याच मुर्ती असाव्यात याबाबत आग्रह धरते आहे. त्यामुळे याबाबत लवकर भूमिका स्पष्ट करा अन्यथा गणेशोत्सवात मुर्तीच उपलब्ध होणार नाहीत, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community