भायखळा (Byculla) टँकपाखडी येथील सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासाचा टप्पा-१ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या आश्रय योजनेच्या (Ashray Yojna) कामांमध्ये तब्बल साडे तीन कोटींनी वाढ झाली आहे. टँकपाखाडी (Tankpakkhadi) येथील पुनर्विकासाच्या (redevelopment project) खोदकामात खडक न लागल्याने बांधकामाच्या पायाच्या प्रकारात बदल करण्यात आला. यासाठी तब्बल तीन कोटींचा खर्च वाढला असून सुमारे ६६.४३ कोटी रुपयांवरून या पुनर्विकास प्रकल्पाचा (redevelopment project) खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे. (Ashray Yojna)
(हेही वाचा- Jitendra Awhad : समविचारी पक्षांसोबत राहा ; जितेंद्र आव्हाड यांची आंबेडकरांना विनंती)
खोदकाम करत पायाचेच काम सुरु
भायखळा (Byculla) टॅकपाखाडी (Tankpakkhadi) येथे टप्पा-१ अंतर्गत घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास (redevelopment project) आश्रय योजनेसाठी (Ashray Yojna) ऑगस्ट २०१९ कंत्राटदाराची निवड केली. कंत्राटदार म्हणून मेसर्स हाय रॉक कंस्ट्रक्शन प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी विविध करांसह ६६. ४३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. या कामांसाठी कंत्राटदाराने महापालिकेच्या अंदाजित रकमेच्या १४ टक्के अधिक दराने हे काम मिळवले होते. कंत्राटाच्या मंजुरीनंतर कंत्राटदाराला पावसाळयासहित ३६ महिन्यांचा कालावधीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. म्हणजे (Ashray Yojna) काम हे ऑगस्ट २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ऑगस्ट २०२३ उलटून आज मार्च २०२४ उलटत आले तरी या प्रकल्पाचे केवळ खोदकाम करत पायाचेच काम सुरु आहे. ज्या ऑगस्टमध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता,त्या वर्षांतील म्हणजे मे २०२२मध्ये भूखंडाचा ताबा मिळून चाळी तोडण्यात आल्या होत्या. या पुनर्विकासात (redevelopment project) स्टील्ट अधिक २० मजली दोन इमारती बांधण्याचे नियोजन असून एकुण २३० सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यातील तळमजल्यावर (स्टील्ट) वाहनतळ असेल. तसेच प्रत्येक सदनिका ही ३०० चौरस फुटांची असेल. (Ashray Yojna)
संक्रमण शिबिर इमारतीमध्ये स्थलांतरित होण्यास विरोध
घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टँकपाखाडी (Tankpakkhadi) येथील सदनिका धारकांकडून वालपाखाडी येथे बांधण्यात आलेल्या संक्रमण शिबिर इमारतीमध्ये स्थलांतरित होण्यास विरोध दर्शविला आणि टँकपाखाडीच्या (Tankpakkhadi) जवळपास पुनर्वसन करण्याची मागणी केली. भाडेकरुंना पर्यायी जागेत स्थलांतरित केल्याशिवाय सदनिकांचे निष्कासन करणे शक्य नसल्याने त्यांना आसपासच्या परिसरात स्थलांतरित करण्यासाठी सदनिकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आग्रिपाडा येथील मालमत्ता विभागाच्या चार मजली इमारतीचे संक्रमण शिबिर रिकामे असल्याने या सर्व भाडेकरूंचे तिथे तात्पुरती पुनर्वसन (redevelopment project) करण्यात आले. (Ashray Yojna)
(हेही वाचा- Narendra Modi: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन)
पुन्हा या भूखंडाची मृदा चाचणी
या भाडेकरूंचे पुनर्वसन (redevelopment project) करण्यात आल्यानंतर या भूखंडाचा ताबा मिळाल्यानंतर मे २०२२मध्ये याच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात पायलिंगच्या कामाला सुरुवात केल्यानंतर ६ ते ८ मीटर पर्यंत खोलवर कठीण खडक लागत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे बांधकाम सल्लागार आणि वास्तूविशारद सल्लागार यांच्या उपस्थितीत कंत्राटदाराने पुन्हा या भूखंडाची मृदा चाचणी केली. या नविन मृदा चाचणी अहवालानुसार असे लक्षात आले की, सरासरी १० मीटर व त्यापुढे मृदू खडक लागत आहे. सदर ठिकाणी मृदू खडक असल्याकारणामुळे खुली पायाभरणीचे काम करणे शक्य नसल्याने सुरू करण्यासाठी आवश्यक बांधकामाचे आराखडे वास्तूविशारद सल्लागार यांचेमार्फत नव्याने बनविण्यात आले. पायाच्या बांधकामामध्ये बदल झाल्यामुळे मूळ कंत्राट कामांमध्ये तीन ते साडेतीन कोटींची वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. (Ashray Yojna)