Ashray Yojna : सांताकुझ, अंधेरी पश्चिममधील सफाई कामगार वसाहतीच्या पुनर्विकासात दोन जागांवर कामेच सुरु नाहीत

Ashray Yojna : कंत्राटदाराला जागेचा ताबा न दिल्याने वाढला ९७ कोटींचा खर्च

1269
Ashray Yojna : सांताकुझ,अंधेरी पश्चिममधील सफाई कामगार वसाहती पुनर्विकासात दोन जागांवर कामेच सुरु नाही
Ashray Yojna : सांताकुझ,अंधेरी पश्चिममधील सफाई कामगार वसाहती पुनर्विकासात दोन जागांवर कामेच सुरु नाही

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतंर्गत (Ashray Yojna) आता अंधेरी पश्चिम येथील यारी रोड, ए.बी. नायर रोड, जुहू गल्ली तसेच सांताक्रुझ पश्चिम येथील न्यू हसनाबाद लेनमधील वसाहतींचा खर्च पुन्हा एकदा वाढला आहे. तब्बल तीन वर्षांपूर्वी या योजनेसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात यातील केवळ दोन जागांवरच काम सुरु असून दोन जागांवर अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. दोन वर्षांमध्ये पुनर्विकास करण्यात येणाऱ्या जागांचा ताबा महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदाराला न दिल्याने त्यांनी किंमतीतील फरकाची रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आणखी ९७ कोटी रुपयांचा खर्च वाढला गेला आहे. (Ashray Yojna)

(हेही वाचा- Underground Waste Bin : घाटकोपरमध्ये बसवल्या जाणार सहा भूमिगत कचरा पेट्या)

सफाई कामगारांना चांगल्या सुसज्ज व हवेशीर, मोकळ्या जागेत राहता यावे साठी महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कामगार वसाहतींचा पुनर्विकासांचे काम आश्रय योजनेतंर्गत (Ashray Yojna) हाती घेतले आहे. मुंबई एकूण सफाई कामगारांच्या ४६ वसाहती असून त्यातील ३६ वसाहतींचा पुनर्विकासा आश्रय योजनेतंर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार  गट ६ मध्ये यारी रोड, ए.बी.नायर रोड, जुहू गल्ली, न्यू हसनाबाद लेन या भागातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून ३०० चौरस फुटाच्या १८४४ तर ६०० चौरस फुटाच्या १४४ अशा स्वरुपाच्या एकूण १९८८ सदनिकांची बांधणी केली जाणार  असल्याने महापालिकेने ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स या कंपनीची निवड केली. (Ashray Yojna)

मे २०२१ या सफाई कामगारांच्या पुनर्विकास प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर जून २०२२ मध्ये यामध्ये सुमारे ५९ कोटी रुपयांचा अतिरिक्त होणार आहे. या अतिरिक्त खर्चाच्या वाढीव कंत्राट कामाला महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या वाढीव खर्चाला मान्यता देताना त्यामध्ये ३०० चौरस फुटांची १४६३ सदनिका बांधण्यात येणार असल्याचे नमुद केले. त्यामुळे ३८१ सदनिका या कमी झाल्या आहेत. (Ashray Yojna)

(हेही वाचा- Eastern Freeway : पूर्वमुक्त मार्गावरून आता थेट पोहोचा ग्रँटरोड नाना चौकात)

 डिझाईन आणि बिल्ड टर्नकीच्या धर्तीवर महापालिकेच्या  क्षेत्रफळावर कंत्राटदारामार्फत आराखडे, स्थापत्य, विद्युत, परिचालन व परिरक्षण या  कामांसाठी कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. या वसाहतींचा जलदगतीने पुनर्विकास करण्यासाठी आश्रय योजनेतंर्गत (Ashray Yojna) पुर्व निर्मिती तंत्रज्ञान अर्थात प्रिहॅब टेक्नॉलॉजी वापरुन प्रायोगिक तत्वावर प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती.

या कामाचे कंत्राट ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स या कंपनीला देण्यात आले. परंतु या कंपनीने आपल्या नावात सुधारणा करून ट्रान्सकॉन कंस्ट्रक्शन इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे नामकरण केले.  या कंत्राट कामांसाठी प्रथम विविध करांसह ६१९ कोटी रुपये एवढे करण्यात आले आहे. आता हे कंत्राट ९७ कोटींनी वाढून ७१६ कोटी रुपये करण्यात आले आहे. (Ashray Yojna)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदार सहायता कक्षाच्या मदतीने मतदान प्रक्रिया सुलभ करण्याचा निवडणुक आयोगाचा प्रयत्न – शर्मा)

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निविदेतील सर्वसाधारण अटीनुसार कंत्राटदाराला जागेचा ताबा दिल्यानंतर जर १२ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी विकासकामाला सुरुवात करणे आवश्यक असते. परंतु यातील दोन जागांचा ताबा उशिराने मिळाल्यामुळे तसेच साधारणत:  २ वर्षे उलटूनही या जागांच ताबा कंत्राटदाराला देण्यात न आल्याने किंमतीतील फरकाने अधिदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालयीन अंदाजानुसार २० टक्के वाढ दिली जात आहे. त्यामुळे कंत्राट रक्कम पुन्हा वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Ashray Yojna)

‘अशाप्रकारे बांधल्या जाणार सदनिका

अंधेरी पश्चिम यारी रोड

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : ३२६ (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :२७० )

प्रस्तावित  ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ०००(प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :००० )

अंधेरी पश्चिम ए बी नायर रोड

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : १९६ (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका : १४१ )

प्रस्तावित  ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ०००(प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :००० )

अंधेरी पश्चिम जुहू गल्ली

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका :५६२, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :३९७ )

प्रस्तावित  ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ५८, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका : ८२ )

सांताक्रुझ पश्चिम न्यू हसनाबाद लेन

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : ७६०, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :६५५)

प्रस्तावित  ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ८६, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :८८ )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.