गायत्री परिवाराच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे २१ ते २५ फेब्रुवारी येथे ‘मुंबई अश्वमेध यज्ञा’चे (Ashwamedh Mahayagya) आयोजन करण्यात आले आहे. खारघर येथील कॉर्पोरेट पार्क ग्राऊंड, पेठपाडा मेट्रो स्टेशन येथे हा महायज्ञ संपन्न होणार आहे. गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पांड्या आणि त्यांची पत्नी शैलबाला पांड्या हे या यज्ञाचे यजमानपद भूषवणार आहेत.
मुंबईच्या आणि देशाच्या उन्नतीचा संकल्प
मुंबईत सुख, शांती आणि समृद्धी नांदावी आणि देशाची उन्नती व्हावी, या उद्देशाने या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संघटित व्हावेत आणि संस्कृतीचे रक्षण व्हावे, या संकल्पाने हे यज्ञ करण्यात येणार आहेत, असे मुंबई गायत्री परिवाराचे (Gayatri Pariwar) प्रमुख मनुभाई पटेल यांनी सांगितले.
(हेही वाचा – BORIVALI FIRING EXCLUSIVE : २ महिन्यांपूर्वी शिजला होता हत्येचा कट)
यज्ञाची भव्यता
या यज्ञासाठी १००८ कुंड असणारी भव्य व दिव्य यज्ञशाळा उभारण्यात येत आहे. शतकांपासुन हिमालयात स्थापन केलेल्या अखंड अग्निपासून यज्ञज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. ८० हून अधिक देशांतील भक्त या यज्ञात सहभाग घेणार आहेत. एक कोटी लोकांचा या यज्ञात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असेल, असे पत्रकात सांगण्यात आले आहे.
यज्ञाच्या निमित्ताने विविध उपक्रम
- महाराष्ट्रातील ५० दिव्य तीर्थक्षेत्रांच्या माती आणि जल द्वारे अभिसिंचित विशाल कलशयात्रा
- भव्य दीपदान (दीपयज्ञ)
- जगातील श्रेष्ठ आध्यात्मिक व्यक्तींद्वारे मार्गदर्शन
- विशाल पुस्तक मेळावा, तसेच भव्य प्रदर्शन
- एक लाखाहून अधिक वृक्षारोपण
- विविध सांस्कृतिक कार्यक्रम
- सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था (Ashwamedh Mahayagya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community