मुख्यमंत्री कार्यालयात Ashwini Bhide यांची प्रधान सचिव पदी वर्णी

1055
मुख्यमंत्री कार्यालयात Ashwini Bhide यांची प्रधान सचिव पदी वर्णी
  • प्रतिनिधी

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव पदी वर्णी लावण्यात आली आहे. भिडे यांनी तात्काळ पदभार स्विकारावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने बदलीचे आदेश काढले आहेत. तसेच, मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभार देखील सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – Vitthal Rukmini Temple Committee: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आता दोन तासात होणार विठुरायाचं दर्शन!)

एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ब्रिजेश सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री प्रधान सचिव पदाचा पदभार होता. परंतु, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर सिंह यांच्याकडून भिडे (Ashwini Bhide) यांच्याकडे प्रधान सचिव पदाचा कारभार सोपवला आहे. मेट्रो वूमन अशी भिडे यांची ओळख आहे. आरेतील वृक्षतोडीनंतर भिडे चांगल्याच चर्चेत आल्या. महाविकास आघाडी सरकारने त्यामुळे त्यांच्याकडून मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा कारभार काढून घेतला होता.

(हेही वाचा – महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास)

मात्र २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा मेट्रो रेलचा पदभार भिडे (Ashwini Bhide) यांच्याकडे सोपवला होता. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांवर आलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी भिडे यांची सामान्य प्रशासन विभागाने निवड करून तातडीने पदभार स्विकारण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.