कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला असून यामध्ये मालाड येथील जंबो कोविड सेंटर तसेच भायखळा रिचडसन क्रुडास येथील घोटाळ्याचे प्रकरण मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी समारे आणून महापालिका आयुक्तांकडे या घोटाळ्याची चौकशी कॅगमार्फत करण्याची मनसेने केली होती. या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबकडून हमी पत्र देण्यास टाळाटाळ: ‘रेसकोर्स’ थकीत रकमेच्या वसुलीचे मार्ग बंद)
कोरोना महामारीच्या काळात महापालिकेत सत्तेव असलेल्या शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. कोरोना या काळात कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला वेगवेगळी कंत्राट देण्यात आली. त्यामध्ये मालाड व भायखळा रिचर्डसन क्रुडास येथे कोरोना सेंटर उभारले होते. या सेंटरमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातुन लाँड्री(कपडे धुणे), सैनिटायझर पुरवठा असे वस्तु पुरविण्याचे कंत्राट युवा सेना पदाधिकारी असलेल्या वैभव थोरात यांनी तयार केलेल्या टक्कर अॅण्ड पवार कंपनी, शिवनेरी इंटरप्राईझेस, शिवचिदंबरम फार्मा, रमेश अॅण्ड असोसिएट, अर्का कंपनी, देवराया इंटरप्राईझेस, जयभवानी इंटरप्रायझेस, ग्रीन स्पेस रियल्टी कंपनी मार्फत दिले,असा आरोप देशपांडे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत करून याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना दिला होते.
वरील सर्व कंपनीने प्रत्यक्ष पुरवठा पेक्षा जास्त बिल सादर केली. त्यामध्ये १० टक्के ते ४० टक्के स्वत: पुरवठा केला गेला आणि १०० टक्के वस्तु पुरवठा केला याची बिल दिली. जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे सांगत देशपांडे यांनी चौकशीची मागणी केली.
या पत्राची दखल घेत प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. ही चौकशी पुढील तीन आठवड्यांमध्ये पूर्ण करून याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिल्याची माहिती मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली आहे.