Ashwini Vaishnav : DeepSeek आणि ChatGPTला टक्कर देण्यासाठी भारत तयार करणार स्वतःचा AI चॅटबॉट ; भारतीय भाषांना असेल प्राधान्य!

38
Ashwini Vaishnav : DeepSeek आणि ChatGPTला टक्कर देण्यासाठी भारत तयार करणार स्वतःचा AI चॅटबॉट ; भारतीय भाषांना असेल प्राधान्य!
Ashwini Vaishnav : DeepSeek आणि ChatGPTला टक्कर देण्यासाठी भारत तयार करणार स्वतःचा AI चॅटबॉट ; भारतीय भाषांना असेल प्राधान्य!

चीनी स्टार्टअप डीपसीकने (DeepSeek) नवीन एआय (AI) इनोव्हेशन ओपन सोर्स इमेज जनरेशन मॉडेल ‘जेनस प्रो ७ बी’ लाँच केले आहे. हे ‘ओपन एआय’ च्या ‘डेल – इ३’ पेक्षा चांगले आहे. चीन आणि अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी भारत पुढील १० महिन्यांत स्वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) (AI) चॅटबॉट तयार करेल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी गुरुवारी (30 जाने.) ही घोषणा केली. देशातील लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) १० महिन्यांत तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे मूलभूत मॉडेल असेल. त्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. (Ashwini Vaishnav)

भारतास जागतिक एआय केंद्र म्हणून अग्रेसर करण्याची सरकारची योजना
स्टार्टअप आणि संशोधकांसाठी ‘कॉमन कॉम्प्युटिंग’ सुविधेंतर्गत १८,६९३ ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (जीपीयू) तैनात करण्याची घोषणाही वैष्णव यांनी केली आहे. भारताने आपल्या एआय मसुद्याच्या पुढील टप्प्याची घोषणा केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. वैष्णव यांनी सांगितले की, भारतास जागतिक एआय (AI) केंद्र म्हणून अग्रेसर करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी एक एआय सुरक्षा संस्था सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानास सर्वांसाठी सुलभ बनविणे, हा आपल्या पंतप्रधानांचा विचार आहे. (Ashwini Vaishnav)

डीपसीकमध्ये गोपनीयतेची चिंता
अश्विनी वैष्णव म्हणाले, “संगणकीय पायाभूत सुविधा सर्वात महत्त्वाची आहे. भारताने याबाबतीत १० हजार जीपीयू क्षमतेचे लक्ष्य गाठले आहे. ते आता १८६०० जीपीयूपर्यंत वाढवण्यात येणार आहे. जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (चिप). कोणत्याही प्रकारचे भाषा मॉडेल तयार करण्यासाठी खूप प्रगत जीपीयूची आवश्यकता असते. अलीकडेच, जगभरात खळबळ माजवणाऱ्या चीनच्या डीपसीक एआय चॅटबॉट आर-१ ने २००० जीपीयू क्षमतेचा वापर केला, तर अमेरिकन एआय कंपनी ‘ओपन एआय’ च्या ‘चॅटबॅाट चॅट जीपीटी’ साठी २५ हजार जीपीयूची क्षमता वापरली जाते. भारतात सध्या १५ हजार जीपीयू क्षमता आहे. आम्ही १८ हजार जीपीयूसह एक सामायिक संगणन सुविधा सुरू केली आहे, जी स्टार्टअप, संशोधक आणि विकासकांसाठी उपलब्ध असेल. डीपसीकमध्ये गोपनीयतेची चिंता आहे, त्यामुळे त्याचा डेटा भारतीय सर्व्हरवर संग्रहित केला जाईल.” (Ashwini Vaishnav)

सर्व भारतीय भाषांमध्ये कार्य
स्वदेशी एआय चॅटबॉट भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) योजनेचा भाग आहे. या मोहिमेवर भारत १०,७५० कोटी रुपये खर्च करत आहे. देशाला प्रगत तंत्रज्ञान केंद्र बनवणे हा त्याचा उद्देश आहे. भारतीय एआय चॅटबॉट चॅटजीपीटी व डीपसीकपेक्षा वेगळा असेल. त्यात सर्व भारतीय भाषांमध्ये उत्तरे आणि मजकूर असेल. भारतीय संदर्भ, भारतीय भाषा आणि संस्कृती यास प्राधान्य असेल. यातील आकडे आमच्या देशासाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे असतील. आमची कॉम्प्युटिंग सुविधा जगात सर्वाधिक स्वस्त असेल. त्याचा ४० टक्के खर्च सरकार उचलेल. त्यानंतर ही सुविधा १ डॉलर प्रति जीपीयू तास या कमीत कमी दराने सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल. आगामी ८ ते १० महिन्यांच्या आत हे मॉडेल बनविले जाईल. (Ashwini Vaishnav)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.