वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi) भारतीय पुरातत्व विभागातर्फे (एएसआय) सर्वेक्षणाला आज म्हणजेच सोमवार २४ जुलै रोजी सकाळी सुरुवात झाली. परंतु, सर्वेक्षणाला सुरुवात होताच तासाभरात सर्वोच्च न्यायालयाने एएसआयच्या सर्वेक्षणाला २६ जुलैपर्यंत स्थगिती दिली. न्यायालयाने २६ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वेक्षण न करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – निधी वाटपातील दुजाभाव हा लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय – अंबादास दानवे)
या दोन दिवसांच्या काळात मशीद (Gyanvapi) समितीची इच्छा असेल तर ती वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकते, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. वाराणसी न्यायालयाने एएसआयला मशिदीत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
Gyanvapi mosque case: SC puts ASI survey on hold till Wednesday 5 pm
Read @ANI Story | https://t.co/jCYNs4PyK1#Gyanvapi #SupremeCourt pic.twitter.com/uvFUXO5jtG
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2023
जुलै २४ रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली, तेव्हा ASI टीम ज्ञानवापीमध्ये (Gyanvapi) सर्व्हे करत होती. सर्वोच्च न्यायालयाने तेथे कोणत्याही प्रकारच्या उत्खननावर तातडीने बंदी घातली. दुपारी २ वाजता पुन्हा सुनावणी करू, असे सांगितले. मात्र सकाळी ११:५० च्या सुमारास न्यायालयाने सर्वेक्षणाला स्थगिती देण्याचे आदेश दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community