Ashwin Dani : एशियन पेंट्सचे गैर-कार्यकारी संचालक अश्विन दाणी यांचे निधन

118
Ashwin Dani : एशियन पेंट्सचे गैर-कार्यकारी संचालक अश्विन दाणी यांचे निधन
Ashwin Dani : एशियन पेंट्सचे गैर-कार्यकारी संचालक अश्विन दाणी यांचे निधन

भारतातील सर्वात मोठी पेंट उत्पादक कंपनी एशिन पेंटसचे गैर-कार्यकारी संचालक अश्विन दाणी (Ashwin Dani ) यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. अश्विन यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत समावेश करण्यात आला होता.

कंपनीचे सहसंस्थापक सूर्यकांत दाणी यांचे ते पुत्र होते. ए शियन पेंट्स ही कंपनी त्यांच्या वडिलांनी १९४२ मध्ये सुरू केली होती. अश्विन दाणी यांचा जन्म २६ सप्टेंबर १९४४ रोजी मुंबईत झाला. १९६६ मध्ये मुंबई विद्यापीठातून रसायन शास्त्रात पदवी संपादन केली. यानंतर त्यांनी अमेरिकेतील अक्रॉन विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. अश्विन दाणी १९६८ मध्ये वडिलांच्या एशियन पेंट्स कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले. ते १९९७ मध्ये एशियन पेंट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. १९४२ मध्ये चंपकलाल चोक्सी, चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील या चार मित्रांनी मुंबईत एशियन पेंट्स आणि ऑईल प्राव्हयेट लिमिटेड सुरू केली. त्यावेळी कंपनीने पांढरा, काळा, पिवळा, लाल आणि हिरवा असे फक्त ५ रंग तयार केले होते.

(हेही वाचा – Nitin Gadkari : लवकरच खड्डेमुक्त राष्ट्रीय महामार्ग हे एक वास्तव असेल, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन)

एशियन पेंट्स ही बाजार भांडावलाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. एशियन पेंट्सचे मार्केट कॅप ३.०३ लाख कोटी रुपये आहे. एशियन पेंट्स १५ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरात २७ उत्पादन युनिट्स आहेत. कंपनीचा व्यवसाय ६० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.