Bribery : झुणझुणवाला कॉलेजच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

230
आमदाराचे शिफारस पत्र देऊनही  कॉलेज ऍडमिशनसाठी दीड लाख रुपयांची लाच (Bribery) मागितल्याचा प्रकार घाटकोपरच्या झुणझुणवाला कॉलेजमध्ये उघडकीस आला आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी रचलेल्या सापळ्यात लाचेची रक्कम स्वीकारताना झुणझुणवाला कॉलेजच्या प्रशासकीय अधिकारी रवींद्रनाथ सिंह याला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी रवींद्रनाथ सिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे टेम्पो चालक असून कुर्ला पश्चिम येथे राहणारे आहे, तक्रारदार यांच्या मुलीला अकरावीला कॉमर्स या शाखेत ऍडमिशन घेण्यासाठी त्यांनी झुणझुणवाला कॉलेजचा ऑनलाईन फॉर्म भरला होता. ऍडमिशनच्या दोन्ही याद्यामध्ये मुलीचे नाव नसल्यामुळे तक्रारदार यांनी झुणझुणवाला कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी रवींद्रनाथ सिंह यांची भेट घेतली असता त्यांनी तिसऱ्या यादीची वाट पहा असे त्यांना सांगितले.
दरम्यान तक्रारदार यांनी मुलीचे झुणझुणवाला कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी स्थानिक आमदार राजहंस सिंह यांचे शिफारस पत्र घेऊन तक्रारदार हे २६ ऑगस्ट रोजी कॉलेजमध्ये गेले. आमदार राजहंस सिंह यांचे शिफारस पत्र  त्यांनी प्रशासकीय अधिकारी रवींद्रनाथ सिंह यांना  दिले, शिफारस पत्र बघितल्यानंतर रवींद्रनाथ सिंह यांनी तक्रारदार यांच्याकडे ऍडमिशनसाठी दीड लाख रुपयांची लाच (Bribery) मागितली. २८ ऑगस्ट रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. २९ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कॉलेज परिसरात सापळा रचून लाचेची ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना झुणझुणवाला कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी रवींद्रनाथ सिंह याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी  लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रवींद्रनाथ सिंह यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.