मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून ३० हजार पेक्षा अधिक लोकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. राज्यातील ७८० गावे पाण्याखाली गेली असून १५१०.९८ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. अशातच गुरुवार २२ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथली परिस्थिती अधिकच बिघडली आहे.
३१ पैकी १० जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. तर राज्यातील १.२ लाख लोकांना आपली घरे आणि जमीन सोडून छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ऑरेंज अलर्ट दिला आहे. ब्रह्मपुत्रेची उपनदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. १० हजार पेक्षा जास्त एकर शेतीचे नुकसान झाले असून ७८० गावे पाण्याखाली गेली आहेत.
(हेही वाचा – उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण देणे हेच उद्दिष्ट असले पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
आयएमडीच्या गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी) कोकराझार, चिरांग, बक्सा, बारपेटा आणि बोंगाईगाव जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाच्या अंदाजासह ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. याच कालावधीत धुबरी, कामरूप, कामरूप महानगर, नलबारी, दिमा हासाओ, कछार, गोलपारा आणि करीमगंज जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
This is unbearable..my prayers for those people who affected by asam flood . I wish may God give them hope and strength🙏#Asamflood pic.twitter.com/SHPZRcoDkA
— Himanshu chauhan (@Himanshu_Aap_) July 20, 2020
दरम्यान, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (एएसडीएमए) दैनंदिन पूर अहवालानुसार, कचार, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, होजई, लखीमपूर, नागाव, नलबारी, सोनितपूर, तिनसुकिया आणि उदलगुरी येथे पुरामुळं 33 हजार 400 हून अधिक लोकांना फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये 16 मदत वितरण केंद्रे चालवण्याव्यतिरिक्त, प्रशासन एक मदत शिबिर चालवत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community