गुवाहाटीत (Guwahati) ईशान्य सीमा रेल्वे (NFR) च्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत आगरतळा रेल्वे स्थानकावर १८ बांगलादेशी नागरिक आणि एका एजंटला अटक केली. याशिवाय, आरपीएफने या महिन्यात एनएफआरच्या विविध स्थानकांमधून ९० अल्पवयीन मुले आणि ०२ महिलांची सुटका केली. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलांना नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. (Assam)
( हेही वाचा : Walmik Karad चा शस्त्र परवाना रद्द; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई)
एनएफआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा (Kapinjal Kishore Sharma) यांनी सांगितले की, अलीकडेच दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी आगरतळा येथील आरपीएफ आणि जीआरपी पथकांनी आणि बदरपूर एसआयबी पथकाने संयुक्तपणे आगरतळा रेल्वे स्थानकावर नियमित तपासणी केली. तपासादरम्यान त्यांनी तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले. नंतर, तिन्ही बेकायदेशीर स्थलांतरितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. (Assam)
दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या दुसऱ्या एका घटनेत, गुवाहाटी येथील आरपीएफ/एसआयबी टीम आणि कामाख्या येथील आरपीएफ टीमने कामाख्या रेल्वे स्थानकावर नियमित तपासणी केली. तपासादरम्यान, त्यांनी कामाख्या रेल्वे स्थानकावरून पळून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांची सुटका केली. नंतर, अल्पवयीन मुलांचा निवासी पत्ता मिळाल्यानंतर, त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यासाठी गुवाहाटी येथील चाइल्ड लाइनकडे सोपवण्यात आले. त्याचप्रमाणे, २९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या एका घटनेत, रंगापरा उत्तर येथील आरपीएफ पथकाने नियमित तपासणी करताना तीन पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांची सुटका केली. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलांना नंतर सुरक्षित ताब्यात घेण्यासाठी तेजपूर येथील चाइल्ड लाइनकडे सोपवण्यात आले. (Assam)
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत, एनएफआरच्या आरपीएफने ९०६ अल्पवयीन मुले आणि ६१ महिलांची सुटका केली आणि ०९ मानवी तस्करांना अटक केली. सुटका करण्यात आलेल्या मुलांना आणि महिलांना संबंधित चाइल्ड लाइन आणि स्वयंसेवी संस्था, पालक आणि सरकारी रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आले. याशिवाय, एनएफआरच्या आरपीएफने या काळात ३०० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. (Assam)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community