धक्कादायक! आसाममध्ये आता ‘फ्लड जिहाद’! नदीचा प्रवाह सोडला शहरात

सध्या आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः यात काही ठिकाणी हा पूर मानवनिर्मित आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि याला धर्मांध मुसलमान युवक कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. आसाममध्ये आता ‘फ्लड जिहाद’ सुरू असल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे शिवसेना नेतेच! उपनेते पदी शिंदे गटातील आमदार कायम)

खड्डा खोदून नदीचा प्रवाही बदलला 

सध्या आसाममध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र यात सिलचर शहरातील पूर हा नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे का, अशी शंका यावी अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण या ठिकाणचा एक व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सिलचर येथील भेटुकंडी या भागातील नदीला पूर आला आहे, त्या नदीचा प्रवाह मोठा खड्डा खोदून नदीतील पुराचे पाणी दोन शहरांत सोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ धर्मांध मुसलमानांना अटक केली आहे. यामध्ये काबुल खान, मिठू हुसेन लष्कर, नाझीर हुसेन लष्कर आणि रिपोन खान अशी अटक केलेल्या मुसलमानांची नावे आहेत. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचा आदेश आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा शर्मा यांनी दिले आहेत.

(हेही वाचा ‘काली’ नावाच्या माहितीपटात श्री कालीमातेला दाखवले सिगरेट ओढतांना! #ArrestLeenaManimekalai tamil ट्विटर ट्रेंड द्वारे संतापजनक प्रतिक्रिया)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here