Assam Flood : आसाममधील पूरस्थिती कायम, ५८३ गावं अजूनही पाण्याखाली

169
Assam Flood : आसाममधील पूरस्थिती कायम, ५८३ गावं अजूनही पाण्याखाली

आसाममधील पुरामुळे (Assam Flood) आतापर्यंत जवळपास १.२२ लाख लोकांचे नुकसान झाले आहे. अजूनही तेथील ७ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) ने रविवारी (३ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, बारपेटा, चिरांग, दररंग, गोलाघाट, कामरूप महानगर, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांचा समावेश आहे.

तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसाममधील (Assam Flood) दररंग हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील ६० हजार ६०० हून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यानंतर गोलाघाट आणि मोरीगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्याचवेळी, शनिवार २ सप्टेंबर पर्यंत १३ जिल्ह्यांतील सुमारे २.४३ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

(हेही वाचा – Stray Dogs: भटके श्वान चावण्याच्या घटनेत महाराष्ट्र आघाडीवर, सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली माहिती)

आसाममधील ५८३ गावं पाण्याखाली

राज्य प्रशासन तीन जिल्ह्यांमध्ये (Assam Flood) ७ मदत शिबिर चालवत आहे. जिथे १ हजार ३३१ लोक आश्रयाला आहेत. याशिवाय चार जिल्ह्यांमध्ये १७ मदत वितरण केंद्रही चालवली जात आहेत. एएसडीएमएने सांगितल्याप्रमाणे, सध्या आसाममधील ५८३ गाव पाण्याखाली आहेत आणि राज्यभरातील ८,५९२.०५ हेक्टर पीक क्षेत्र नष्ट झालं आहे. आसाममधील ९७ हजार ४०० हून अधिक पाळीव प्राणी आणि कोंबड्या पुरामुळे बाधित झाल्या आहेत.

आसाममध्ये पुरामुळे एकूण १८ जणांचा मृत्यू

आत्तापर्यंत आसाममध्ये पुरामुळे (Assam Flood) एकूण १८ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. शनिवारी (२ सप्टेंबर) ASDMA च्या अधिकृत अहवालात, राज्यातील पूरग्रस्तांची संख्या अडीच लाखांवर आली असून आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.