Assam Flood Situation : आसाममध्ये पूरस्थिती; गुजरातच्या अनेक गावांचा संपर्क तुटला

70
Assam Flood Situation : आसाममध्ये पूरस्थिती; गुजरातच्या अनेक गावांचा संपर्क तुटला
Assam Flood Situation : आसाममध्ये पूरस्थिती; गुजरातच्या अनेक गावांचा संपर्क तुटला

मान्सून संपूर्ण देशात पोहोचला असून अंदाज व्यक्त केलेल्या वेळेच्या सहा दिवस आधीच त्याची प्रगती झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे जूनच्या मध्यामध्ये मान्सूनचा वेग मंदावला असूनही तो लवकर संपूर्ण देशात पोहोचला आहे.हवामान विभागाने मंगळवारी एक निवेदन प्रसृत करून माहिती दिली की, ‘‘नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामुळे मान्सूनने २ जुलैलाच संपूर्ण देश व्यापला आहे, सामान्यपणे ही तारीख ८ जुलै असायला हवी होती.’’ (Assam Flood Situation)

(हेही वाचा- Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धोका?)

केरळ आणि ईशान्य भागात ३० मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. केरळमध्ये दोन तर ईशान्य भारतात सहा दिवस आधी तो दाखल झाला होता. त्यानंतर तो महाराष्ट्रातून पुढे सरकला, पण त्यादरम्यान त्याचा जोर कमी झाला. त्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पावसाची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, आसाम, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच ईशान्येकडील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, भूस्खलन अशा घटना घडत आहेत. (Assam Flood Situation)

पूरामुळे 44 रस्ते, एक पूल आणि 6 बंधारे वाहून गेले 

आसाममध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसंकट निर्माण झाले आहे. 19 जिल्ह्यांमधील 6.44 लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पूरामुळे आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. ब्रह्मपुत्रा, सुबनसिरी, दिखी, दिसांग, बुरहिदिहिंग, जिया-भराली, बेकी आणि कुशियारा नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मागील 24 तासांमध्ये पूरामुळे 44 रस्ते, एक पूल आणि 6 बंधारे वाहून गेले आहेत. (Assam Flood Situation)

(हेही वाचा- Hathras Accident : सत्संगामधील चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू; प्रवचन देणारा भोले बाबा फरार)

मिझोरममध्ये भूस्खलन

मिझोरमच्या आयजोलमध्ये मंगळवारी भूस्खलनामुळे 4 वर्षीय मुलीसमवेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण घरात झोपलेले असताना भूस्खलनामुळे इमारत जमीनदोस्त झाली. यादरम्यान घरातील काही सदस्यांनी तेथून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचविला, परंतु एक जोडपे आणि त्यांची मुलगी ढिगाऱ्याखाली सापडली. (Assam Flood Situation)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.